धक्कादायक! ट्रेडमिलवर धावताना २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू, जिममध्ये काय घ्याल काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:46 AM2019-09-27T11:46:00+5:302019-09-27T11:51:47+5:30

फिटनेससाठी जिमला जाण्याची क्रेझ अलिकडे फारच वाढलेली बघायला मिळते. पण गंभीरपणे एक्सरसाइज करणारे किती असतात किंवा एक्सरसाइज करताना पुरेशी काळजी किती लोक घेतात?

24 year old Engineer running on treadmill in gym, Died from heart attack | धक्कादायक! ट्रेडमिलवर धावताना २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू, जिममध्ये काय घ्याल काळजी?

धक्कादायक! ट्रेडमिलवर धावताना २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू, जिममध्ये काय घ्याल काळजी?

googlenewsNext

(Image Credit : sky-liners.com)(सांकेतिक फोटो)

फिटनेससाठी जिमला जाण्याची क्रेझ अलिकडे फारच वाढलेली बघायला मिळते. पण गंभीरपणे एक्सरसाइज करणारे किती असतात किंवा एक्सरसाइज करताना पुरेशी काळजी किती लोक घेतात? हा प्रश्नच आहे. मात्र, जिममध्ये एक्सरसाइज करताना तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाही तर तुमच्यासाठी हे जीवघेणं ठरू शकतं. अशीच एक घटना नोएडामध्ये घडली आहे. या घटनेतून हे समोर येतं की, एक्सरसाइज करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, येथील एका जिममध्ये एक व्यक्ती ट्रेडमिलवर धावत होती. अचानक ही व्यक्ती चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या तरूणाला हार्ट अटॅक आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूळचा उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये राहणारा २४ वर्षीय यश उपाध्याय आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. इंजिनिअरींग केल्यानंतर तो नेटवर्किंगचा कोर्स करण्यासाठी एक महिन्याआधी नोएडा सेक्टर ७६ मधील जेएम ऑर्किड सोसायटीमध्ये मावशीकडे राहत होता. 

मृत यशच्या काकांनी सांगितले की, यश रोज सकाळी सोसायटीतील क्लबच्या जिममध्ये एक्सरसाइज करण्यासाठी जात होता. बुधवारी सकाळी त्याला वेळ मिळाला नाही, त्यामुळे तो सायंकाळी साडेसात वाजता जिमला गेला. तेथे एका ट्रेडमिलवर धावू लागला. अचानक त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. यशच्या पोस्टमार्टम रिपोर्टबाबत पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. मात्र, त्याला मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिममध्ये कोणती काळजी घ्याल?

- वर्कआउटआधी ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपेतून उठल्यावर एक तासानंतर जिमला जावे.

- जेवण केल्यावर २ तासांनी एक्सरसाइज करावी, नाही तर पोटात वेदना किंवा पोट टाइट होण्याची समस्या होऊ शकते.

- अनोशा पोटी एक्सरसाइज अजिबात करू नका. एक्सरसाइज करण्याआधी फळं किंवा ड्राय फ्रूट्सचं सेवन करावं.

- एक्सरसाइज करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा लिटर पाणी प्यावं. तसेच एक्सरसाइज करताना दर १५ मिनिटांनंतर ४ ते ५ घोट पाणी सेवन करा.

- एक्सरसाइज करून झाल्यावर अर्ध्या तासाने केवळ एक कप पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्यास नुकसान होऊ शकतं.

- रात्रीच्या वेळी शरीर थकलेलं असतं, अशावेळी एक्सरसाइज केल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

- रात्री एक्सरसाइज करणं गरजेचं असेल तर भात, मांस, डाळ आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा.

Web Title: 24 year old Engineer running on treadmill in gym, Died from heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.