CoronaVirus Live Updates: धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे 30 वेळा म्युटेशन; WHO ने बोलावली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:42 PM2021-11-26T13:42:05+5:302021-11-26T13:43:23+5:30

Coronavirus New Variant found in South Africa: हा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

30 times mutation of new variant of Corona virus South Africa; WHO called an emergency meeting | CoronaVirus Live Updates: धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे 30 वेळा म्युटेशन; WHO ने बोलावली तातडीची बैठक

CoronaVirus Live Updates: धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे 30 वेळा म्युटेशन; WHO ने बोलावली तातडीची बैठक

Next

गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे वादळ शमत नाही तोच नव्या व्हेरिअंटने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले होते, परंतू आता या व्हेरिअंटने जगाला भितीच्या छायेत लोटले आहे. नवीन व्हेरिअंट साऊथ आफ्रिकेत सापडला  (Coronavirus New Variant) असला तरी तो वेगाने प्रसार करत असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटचे आजवर 30 हून अधिकवेळा म्युटेशन झाले आहे. या व्हेरिअंटला B.1.1.529 नाव देण्यात आले आहे. 

हा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, 'NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.' शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.

डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडनमधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.1.1.529)ची माहिती दिली होती. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञही या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत. प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक म्हणतात की, 'दक्षिण आफ्रिकेत एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल.

शास्त्रज्ञही चिंतेत
सतत रुप बदलण्यामुळे WHO सोबतच शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणे ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुस-या लहरीमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असेच उत्परिवर्तन झाले आणि ते घातक ठरले. सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्याची लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जात आहे. यास वेळ लागू शकतो. अशा स्थितीत तोपर्यंत या प्रकाराने मोठे रुप घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

WHO ने मोठी बैठक बोलावली
दरम्यान, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या नवीन प्रकारावर विचारमंथन होणार आहे. WHO म्हणते की या प्रकारावर अधिक संशोधन आवश्यक आहे. आपण अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस मिळवून देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा सामना करता येईल.

Read in English

Web Title: 30 times mutation of new variant of Corona virus South Africa; WHO called an emergency meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.