खतरनाक महामारीचा धोका! ३० व्हायरस घालू शकतात थैमान, २०० शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:05 AM2024-08-06T10:05:01+5:302024-08-06T10:06:02+5:30

हे व्हायरस अत्यंत धोकादायक आहेत आणि वेगाने पसरतात आणि लोकांना वेगाने संक्रमित करू शकतात. चिंतेची बाब म्हणजे यापैकी फारच कमी व्हायरससाठी लस उपलब्ध आहेत.

30 viruses are ready to start another pandemic who 200 scientists warned next pathogens pandemic | खतरनाक महामारीचा धोका! ३० व्हायरस घालू शकतात थैमान, २०० शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

खतरनाक महामारीचा धोका! ३० व्हायरस घालू शकतात थैमान, २०० शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाची भीती आजही आपल्या मनात आहे. आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० धोकादायक व्हायरस आणि बॅक्टेरियाची यादी जारी केली आहे जे भविष्यात महामारीचं रूप घेऊ शकतात. रिपोर्टमध्ये डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, शास्त्रज्ञांनी अशा ३० सूक्ष्मजीवांचे विश्लेषण केले आहे जे जगभरातील आरोग्य क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण करू शकतात आणि महामारीचे रूपही घेऊ शकतात. अनेक पुराव्यांच्या आधारे शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे. 

हे व्हायरस अत्यंत धोकादायक आहेत आणि वेगाने पसरतात आणि लोकांना वेगाने संक्रमित करू शकतात. चिंतेची बाब म्हणजे यापैकी फारच कमी व्हायरससाठी लस उपलब्ध आहेत.  TOI नुसार, नेचर जर्नलच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, २०१७ आणि २०१८ मध्ये, WHO ने अशा अनेक व्हायरसचा शोध लावला. यासाठी २०० हून अधिक शास्त्रज्ञांनी दोन वर्षे याचं विश्लेषण केलं. यापैकी बहुतेक व्हायरस तर बॅक्टेरिया होते. 

३० व्हायरसची ओळख पटली जे महामारी पसरवण्यास तयार आहेत. म्हणजे या व्हायरस किंवा बॅक्टेरियामध्ये साथीचे रोग पसरवण्याची क्षमता असते. या ३० पैकी संभाव्य साथीच्या व्हायरसमध्ये, इन्फ्लूएंझा ए व्हायरस, डेंग्यू व्हायरस आणि मंकीपॉक्स सारखे व्हायरस आहेत. अलीकडे, अमेरिकेत इन्फ्लूएंझा ए व्हायरसचे अनेक प्रकार आढळून आले. या यादीमध्ये कॉलरा, प्लेग, डिसेंटरी, डायरिया आणि न्यूमोनिया पसरवण्यासाठी जबाबदार असलेल्या पाच नवीन स्ट्रेनचा समावेश आहे. नुकताच भारतात आढळलेल्या निपाह व्हायरसचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

नेचर रिपोर्टनुसार, WHO ने काही प्रोटोटाइप व्हायरस देखील ओळखले आहेत जे वैज्ञानिक अभ्यासासाठी मॉडेल प्रजाती असल्याचे सिद्ध होऊ शकतात आणि त्या आधारावर एक लस विकसित केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, आग्नेय आशियामध्ये सर्वात धोकादायक ठरणाऱ्या व्हायरसमध्ये व्हायब्रिओ कॉलरा ०१३९, शिंजेला डिस्ट्रिटस सेरोटाइप १, हेनिपाव्हायरस निपाहेन्से, बेंडाव्हायरस डेबिन्से, ऑर्थोफ्लाविव्हायरस डेंग्यू आणि झिका आणि अल्फाव्हायरस चिकनगुनिया हे आहेत.

डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, आम्ही केवळ रोग पसरवण्यास सक्षम असलेल्या व्हायरसवरच नाही तर सर्व प्रकारच्या संभाव्य व्हायरसवर संशोधन करत आहोत जेणेकरुन जेव्हा आव्हानात्मक वेळ येईल तेव्हा त्यांना जोरदारपणे सामोरे जावे आणि त्यांचा प्रसार रोखता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्य बळकट केले जाऊ शकतं आणि या अज्ञात धोक्याविरुद्ध लोकांमध्ये जागरूकता पसरवली जाऊ शकते. 
 

Web Title: 30 viruses are ready to start another pandemic who 200 scientists warned next pathogens pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.