मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण

By स्नेहा मोरे | Published: December 25, 2020 01:53 AM2020-12-25T01:53:56+5:302020-12-25T06:56:49+5:30

mental problems : गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ होते, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले.

300% increase in mental problems, corona period report observation | मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण

मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : यंदा कोरोना संसर्गामुळे अचानक जाहीर झालेल्या लाॅकडाऊनचा सामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या काळात मानसिक आरोग्याच्या तक्रारींविषयी मार्गदर्शन घेण्याचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढले. यात महिलांचे प्रमाण ३३ टक्के आहे. 
गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ होते, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले.  मुख्यतः ऑनलाइन मानसिक स्वास्थ्याविषयी सल्लामसलत घेण्याचे प्रमाण लाॅकडाऊनमध्ये वाढले, एरव्ही कधी आपल्या आरोग्याला महत्त्व न देणाऱ्या महिला यात अग्रक्रमी आहेत.
अहवाल निरीक्षणानुसार, वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच ऑनलाइन कन्सल्टेशन करण्याकडे सर्वाधिक कल वाढला. २६ टक्के सामान्यांनी जनरल फिजिशियन, २० टक्के व्यक्तींनी त्वचाविकारतज्ज्ञ, १६ टक्के व्यक्तींनी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि अन्य प्रत्येकी सात टक्के व्यक्तींनी कान, नाक, घसा, बालरोगतज्ज्ञ या शाखा तज्ज्ञांकडून सल्ला, औषधोपचार घेतले.
राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास चेन्नईत टेलिमेडिसीनचा वापर सर्वाधिक व्यक्तींनी केला. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता या शहरांतील टेलिमेडिसीनचे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. अहवालानुसार, न्यूरोसर्जन, हृदयविकारतज्ज्ञ, ऑन्कोलाॅजिस्ट अशा तज्ज्ञांकडील शारीरिक तक्रारींविषयीचा ओघ ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण आहे.

ज्येष्ठ नागरिकही तंत्रज्ञानस्नेही
अहवालानुसार, ५० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. टेलिमेडिसीनच्या एकूण प्रमाणात हे प्रमाण १२ टक्के एवढे आहे. 
गेल्या वर्षी हे प्रमाण ५ टक्के होते.

Web Title: 300% increase in mental problems, corona period report observation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.