फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या वनस्पतींचा आहारात करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:33 AM2018-10-02T10:33:51+5:302018-10-02T10:34:12+5:30

फुफ्फुसाचा कॅन्सर ही फार गंभीर समस्या असून याचं मुख्य कारण स्मोकिंग मानलं जातं. तसेच बदलत्या वातावरणामुळे होणारं वायू प्रदुषण आणि त्यात केलेलं स्मोकिंग यामुळे ही समस्या अधिक दुप्पट होते.

4 amazing herbs to fight lung cancer | फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या वनस्पतींचा आहारात करा समावेश!

फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या वनस्पतींचा आहारात करा समावेश!

googlenewsNext

फुफ्फुसाचा कॅन्सर ही फार गंभीर समस्या असून याचं मुख्य कारण स्मोकिंग मानलं जातं. तसेच बदलत्या वातावरणामुळे होणारं वायू प्रदुषण आणि त्यात केलेलं स्मोकिंग यामुळे ही समस्या अधिक दुप्पट होते. एका रिसर्चनुसार, स्मोकिंग सोडल्यानंतर १५ वर्षांनीही कॅन्सर होण्याचा धोका असतो. द हेल्थ साईटने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हालाही स्मोकिंग सोडल्यानंतर कॅन्सरची शक्यता कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही खास औषधी वनस्पतींचा समावेश करावा लागेल. 

गुळवेल 

गुळवेळ सर्वात चांगलं अॅंटीबायोटीक आणि अॅंटी-ऑक्सिडेंट वनस्पती मानली जाते. जी कॅन्सरपासून बचाव करु शकते. रोज याचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, याने तुम्हाला कन्सरच्या पेशींसोबत लढण्यास मदत मिळते. या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे. गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते.

ज्येष्ठमध

घशाची खवखव किंवा खोकलाच नाही तर याचं सेवन फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीही केला जातो. ज्येष्ठमधाचा वापर केवळ घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीच नाही तर फुफ्फुसाचा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीही केला जातो. 

तुळशी

तुळशी एक अशी औषधी वनस्पती आहे जी कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव करते. अॅंटीऑक्सिडेंट गुण असल्याने याचे सेवन केल्यास कॅन्सर रोखण्यात मदत मिळते. रोज तुळशीची काही पाने खाल्यास अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

लसूण

लसणामध्ये असे अनेक गुणकारी तत्व आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करु शकतात. रोज याचं सेवन केल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात आणि याने फुफ्फुसंही निरोगी राहतात. 
 

Web Title: 4 amazing herbs to fight lung cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.