शेवग्याच्या शेंगा खाण्याचे आरोग्यादायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या खास 4 फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:59 PM2022-06-24T13:59:25+5:302022-06-24T13:59:32+5:30

Drumsticks Benefits: हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.

4 benefits of eating drumsticks in diabetes and immunity | शेवग्याच्या शेंगा खाण्याचे आरोग्यादायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या खास 4 फायदे

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे आरोग्यादायी फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या खास 4 फायदे

Next

Drumsticks Benefits:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापन दिनावेळी फिटनेस इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटीज आणि सामान्य जनतेशी संवाद साधला होता. फिट इंडिया डायलॉग सेशनमध्ये बोलताना मोदी यांनी सांगितलं होतं की, ते आठवड्यातून एक ते दोन वेळा शेवग्याच्या शेंगाचे पराठे खातात. शेवग्याच्या शेंगा अशी भाजी जी सामान्यपणे सांबर बनण्यात वापरली जाते. पण यापासून इतरही काही पदार्थ बनवले जातात. याची भाजीही लोक आवडीने खातात. अशात याचे फायदेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. चला जाणून घेऊ आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर आवर्जून का करावा.

हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळवली जाऊ शकते.

पचन चांगलं होतं

शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी12 भरपूर प्रमाणात असतात. जे पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगा पचण्यासाठी हलक्या आहेत आणि यात फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पचन क्रियाही सहज होते.

ब्लड शुगर होते कमी

डायबिटीस रूग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा वरदान मानल्या जातात. याने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. डायबिटीसचे रूग्ण शेवग्याच्या शेंगाचे पराठ, शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा खिचडीमध्ये शेंगा टाकून खाऊ शकतात.

इम्यूनिटी वाढते

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने इम्यूनिटीही वाढते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने या शेंगा सर्दी-खोकलासारखे व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यातही फायदेशीर ठरतात. सोबतच यातील अॅंटीबॅक्टेरिअल गुण बदलत्या वातावरणात होणारे आजारही दूर ठेवतात.

हाडे होतात मजबूत

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने तसे तर फायदे खूप होतात. पण ही भाजी जास्त हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. शेवग्याच्या शेंगा कॅल्शिअमचा स्त्रोत आहेत. म्हणजे यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आहे. जे हाडांना मजबूत करतं.

Web Title: 4 benefits of eating drumsticks in diabetes and immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.