गॅस आणि अ‍ॅसिडिटीने आहात हैराण? या ४ एक्सरसाइजने मिळवा योग्य समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 11:58 AM2019-06-06T11:58:05+5:302019-06-06T12:04:36+5:30

गॅस आणि अ‍ॅसिडिटची समस्या यावर केवळ औषध हाच उपाय नाही, एक्सरसाइजच्या माध्यमातूनही या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

4 best exercise for better digestive system | गॅस आणि अ‍ॅसिडिटीने आहात हैराण? या ४ एक्सरसाइजने मिळवा योग्य समाधान!

गॅस आणि अ‍ॅसिडिटीने आहात हैराण? या ४ एक्सरसाइजने मिळवा योग्य समाधान!

Next

गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या अलिकडे सामान्य झाली आहे. पोटाची कोणत्याही प्रकारची समस्या होऊ लागली तर आपण औषधांवर अवलंबून राहू लागतो. पण औषधांमुळे समस्या बरी होण्याऐवजी आणखी वाढू लागते. पचनसंस्थेत जर काही गडबड झाली तर गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ लागते. अलिकडे तर नेहमीच ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. पण यावर केवळ औषध हाच उपाय नाही, एक्सरसाइजच्या माध्यमातूनही या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या जेवढी खाण्या-पिण्याशी जुळलेली आहे. तेवढीच ती  शारीरिक श्रमाशीही संबंधित आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फायदेशीर चार एक्सरसाइज.

सायकल चालवणे

सायकल चालवून तुम्ही तुमचं फिटनेस आणि आरोग्य तर चांगलं ठेवूच शकता, सोबतच पचनक्रियाही व्यवस्थित ठेवू शकता. जर तुम्हाला गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रोज थोडा वेळ काढून सायकल चालवली पाहिजे. सायकल चालवल्याने शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि फिटनेस लेव्हलही हाय होते. पचनासंबंधी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर रोज सायकल चालवली पाहिजे.

वेगाने पायी चालणे

वेगाने पायी चालण्याच्या एक्सरसाइजबाबत तुम्ही नेहमीच वाचत असाल. याचा फिटनेसला फायदा होण्यासोबतच गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठीही फायदा होतो. तुम्ही गॅस, अपच यांसारख्या समस्यांनी नेहमीच हैराण राहत असाल तर तुम्ही रोज कमीत कमी ५ हजार पावलं वेगाने चालली पाहिजेत. जर तुमचं वय ४० पेक्षा कमी असेल तर तुम्ही रोज १२ हजार पावलं पायी चालू शकता.

पोटाचा घेर कमी करते क्रंचेज एक्सरसाइज

(Image Credit : The Cheat Sheet)

पोटाच्या मांसपेशींमध्ये जेव्हाही कमजोरी येते तेव्हा पचनसंस्था खराब होऊ लागते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असेल तर तुम्ही क्रंचेज एक्सरसाइज रोज केली पाहिजे. क्रंजेज एक्सरसाइजने तुम्ही इतर समस्या सोडवण्यासोबतच बाहेर आलेलं पोटही कमी करू शकता.

श्वासाची एक्सरसाइज

मोठा श्वास घेण्याची एक्सरसाइज योगा करताना अनेकदा केली जाते. पण तुम्ही जर योगा करत नसाल तर मोठा श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून कमीत कमी दोनदा तुम्ही मोठा श्वास घेण्याची एक्सरसाइज काही मिनिटांसाठी करू शकता. या एक्सरसाइजने तुमच्या पोटाची समस्या दूर होऊ शकते.

Web Title: 4 best exercise for better digestive system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.