Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:10 PM2022-07-27T13:10:51+5:302022-07-27T13:11:06+5:30
Health Tips For Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या समस्या डोकं वर काढतात. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. ते काय आहेत हे जाणून घेऊ...
Health Tips For Cholesterol: कोलेस्ट्रॉलची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये सारखीच बघायला मिळते. जर वेळेत कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं गेलं नाही तर पुढे जाऊन समस्या आणखी वाढू शकते. नेहमीच असंतुलित आहार घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरात अनेक समस्या वाढतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या समस्या डोकं वर काढतात. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. ते काय आहेत हे जाणून घेऊ...
बीटरूट्सचा ज्यूस
बीट एकप्रकारचं मूळ आहे. जे लोक सलादच्या रूपात खातात. त्वचा चमकदार करण्यासाठी लोक याचा वापर करतात. बिटाच्या ज्यूसचं रोज सेवन केलं तर याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते. या ज्यूसच्या सेवनाने स्ट्रोकचा धोका कमी होतो. कारण यात अनेक गुण असतात. जसे की, अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-इन्फ्लेमेटरी, फॉस्फोरस, व्हिटॅमिन बी इत्यादी.
कारल्याचा ज्यूस
कारलं ही एक भाजी आहे. बरेच लोक कारल्याची भाजी खाणं पसंत करतात तर काही लोकांना ती आवडत नाही. कारल्यामध्ये अनेक शरीरासाठी आवश्यक तत्व असतात. यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई सारखे तत्व असतात. त्वचेच्या फायद्यासाठीही याचं सेवन केलं जातं. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत असेल तर याचा ज्यूस पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
दुधी भोपळ्याचा ज्यूस
दुधी भोपळ्याची भाजी सगळे लोक खातात. जी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. दुधी भोपळ्यात साधारण 98 टक्के पाणी असतं. पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी दुधी भोपळा फार फायदेशीर असतो. दुधी भोपळ्याचा ज्यूस पिल्यावर हार्ट स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसेच याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होऊ शकतं.
अॅलोव्हेरा ज्यूस
अॅलोव्हेरा ज्यूस आरोग्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. हा ज्यूस पिण्यास थोडा कडवट लागू शकतो. पण याने अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. आज याचा वापर अनेक कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये म्हणजे फेस जेल, फेस वॉश, अॅलोव्हेरा पॅकेज ज्यूस बनवण्यासाठी करतात. याच्या सेवनाने तुम्ही शुगर लेव्हल कंट्रोल करू शकता. अॅलोव्हेराने शरीरातील सूज कमी होते आणि हाय कोलेस्ट्रॉलही कमी केलं जाऊ शकतं.
(टिप - वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर अवलंबून आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर तज्ज्ञांनी संपर्क साधा. त्यानंतरच या टिप्सचा वापर करा.)