मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नये 'या' ४ गोष्टी, आरोग्याचं होईल नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:13 AM2024-11-16T10:13:34+5:302024-11-16T10:15:00+5:30
हिवाळ्यात भरपूर लोक मुळाचं सेवन करतात. मात्र, मुळ्यासोबत काही गोष्टी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Healthy Tips : रोज आहारात वेगवेगळ्या पदार्थांचं, भाज्यांचं आणि फळांचं सेवन केल्या जातं. मात्र, काही गोष्टी एकत्र खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. काही गोष्टी अशा असतात ज्या एकट्या खाणंच फायदेशीर ठरतं. तेव्हाच त्यातील पोषक तत्व शरीराला मिळतात. हिवाळ्यात भरपूर लोक मुळाचं सेवन करतात. मात्र, मुळ्यासोबत काही गोष्टी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुळ्यासोबत काय खाऊ नये?
मुळ्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, प्रोटीन, कॅल्शिअम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. मूळा तसा तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. मात्र, यासोबत काही गोष्टींचं सेवन करणं नुकसानकारक ठरतं.
मूळा आणि दूध
मुळ्यासोबत दुधाचं सेवन केल्याने शरीरात हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याने अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्याही होऊ शकते. त्यामुळे मुळ्यासोबत कधीच दुधाचं सेवन करू नये.
मूळा आणि संत्री
मूळा आणि संत्री वेगवेगळे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. एकाच वेळी दोन्ही गोष्टींचं सेवन केल्यास नुकसान होऊ शकतं. याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
मूळा आणि काकडी
अनेक लोक सलादमध्ये काकडी आणि मूळा एकत्र खातात. पण काकडीमध्ये एस्कोर्बेट किंवा एस्कॉर्बिक अॅसिड असतं. जे व्हिटॅमिन सी नष्ट करतं. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे मूळा व काकडी कधीच एकत्र खाऊ नये.
मूळा आणि चहा
मुळ्याची भजी काही लोक आवडीने चहासोबत खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरतं. मुळ्यासोबत चहाचं सेवन केल्यास बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. पोटात थंड आणि गरम स्थिती तयार झाल्याने समस्या होऊ शकते.