बोटांमध्ये दिसतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 4 लक्षण, हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:42 AM2023-03-29T09:42:26+5:302023-03-29T09:43:01+5:30
High Cholesterol Symptoms: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो.
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढणं ही आपल्यासाठी फार गंभीर बाब आहे. मेणासारख्या या चिकट पदार्थामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह थांबतो किंवा हळूवार होतो. अशात तुम्हाला हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा सगळ्यात जास्त धोका असतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं होऊ बसतं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं
हाय फॅट असलेल्या पदार्थांचं अधिक सेवन, स्मोकिंग, मद्यसेवन, एक्सरसाइज न करणे आणि जास्त वजन असणे इत्यादींमुळे रक्तात कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्यावर हात आणि पायांवर काय काय लक्षण दिसतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय काय करावं.
हात-पायावर लक्षण
हाय कोलेस्ट्रॉल वाढल्याने बोटांमध्ये वेदना होऊ लागतात. जेव्हा हात आणि पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा त्यात वेदना जाणवू लागतात.
झिणझिण्या येणं
हात आणि पायांच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यावर बोटांमध्ये झिणझिण्या जाणवू लागतात. झिणझिण्या म्हणजे व्यक्तीला त्वचेमध्ये जळजळ, टोचल्यासारखं किंवा सुई टोचल्यासारखं वाटू लागतं. ही डायबिटीसची सुद्धा लक्षण असू शकतात.
बोटं आणि हातावर पिवळेपणा
क्लीवलॅड क्लीनिकच्या एका रिपोर्टनुसार, रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्वचा पिवळ्या रंगाची दिसू लागते. खासकरून डोळ्यांजवळची. कधी कधी हात आणि तळपायही पिवळे दिसू लागतात.
बचावासाठी काय करावं
- ट्रान्स फॅट, सॅचुरेटेड फॅट आणि रिफाइंड असलेल्या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतं, त्यामुळे असे पदार्थ टाळा.
- जर तुम्ही स्मोकिंग किंवा ड्रिंक करत असाल तर ते आजच बंद करा. यामुळे रक्तात वेगाने बॅड कोलेस्ट्रॉल तयार होतं.
- जर तुमचं वजन वाढत असेल आणि ते कमी करण्यासाठी तुम्ही काहीच करत नसाल तर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक राहतो.
- एक्सरसाइज न करणं कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. जर तुम्ही कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर वेळीच सावध व्हा.
- फार जास्त तणावात राहिल्यानेही कोलेस्ट्रॉल वाढतं. स्ट्रेस हार्मोनल वाढल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होतं.