पीठ मळताना 'या' ४ गोष्टींचा करा समावेश, अनेक आजारांपासून होईल बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:34 PM2024-09-02T12:34:48+5:302024-09-02T12:41:57+5:30

Health Tips : जर चपाती बनवताना त्यात काही गोष्टी मिक्स केल्यावर फायदे जास्त मिळतात. फिटनेस कोच दशमेश राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे. 

4 things to mix in flour to enhance nutrition value | पीठ मळताना 'या' ४ गोष्टींचा करा समावेश, अनेक आजारांपासून होईल बचाव!

पीठ मळताना 'या' ४ गोष्टींचा करा समावेश, अनेक आजारांपासून होईल बचाव!

Health Tips : आजकाल लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत असतात. याला त्यांच्याच काही चुका जबाबदार असतात. अशात लोकांना अनेक दिवस काही औषधे घ्यावी लागतात. मात्र, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी काही घरगुती औषधेही फायदेशीर ठरतात. ज्यात चपातीचं सेवन करणं हा एक उपाय आहे. चपाती आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असते. याच्या सेवनाने शरीराला जास्त एनर्जी आणि पोषण मिळतं.

अशात जर चपाती बनवताना त्यात काही गोष्टी मिक्स केल्यावर फायदे जास्त मिळतात. फिटनेस कोच दशमेश राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे. 

राव यांनी सांगितलं की, पीठ मळताना त्यात काही गोष्टी टाकल्या तर चपाती आणखी हेल्दी बनते. जसे की, यात मेथी, ओवा आणि अळशी टाकाव्या. या बीया एकप्रकारे सुपरफूड असतात. या बीया पीठामध्ये टाकल्यास चपाती औषधांपेक्षाही प्रभावी ठरू शकते.

चपाती तुम्हाला अधिक हेल्दी करायची असेल तर त्यात मेथी, ओवा, अळशी आणि पांढरे तीळ टाका. यांचं सेवन करून तुम्ही आजारी पडणार नाहीत. या चारही बियांचं पावडर तयार करा आणि पीठ मळताना त्यात मिक्स करा. चारही बीया समान घ्या. ५ ते ६ चपात्यांच्या पीठामध्ये एक चमचा पावडर टाका.

काय होतील फायदे?

मेथीच्या बीया

पीठामध्ये मेथीच्या बीया मिक्स केल्याने अनेक फायदे मिळतात. या बियांमध्ये सॅपोनिन, हायड्रॉक्सी सॉल्यूशन, फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास, सूज कमी करण्यास मदत करतात. या बीया डायबिटीसच्या रूग्णांसाठी अधिक फायदेशीर असतात.

अळशीच्या बीया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर असतं, ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. तसेच या बियांनी शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर या बियांमुळे हाडेही मजबूत होतात.  

ओवा

आयुर्वेदात अनेक समस्या दूर करण्यासाठी ओव्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. यात अनेक औषधी गुण असतात. ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं, ज्याने पचनासाठी आवश्यक एंझाइम्स वाढतात. ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच ओव्यामध्ये अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

पांढरे तीळ

पांढऱ्या तिळांचं सेवन केल्याने हाडं आणि हृदय दोन्ही निरोगी राहतात. पांढऱ्या तिळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं, जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. त्याशिवाय यात कॅल्शिअम भरपूर असतं. ज्यामुळे हाडं आणि दात निरोगी राहतात.

Web Title: 4 things to mix in flour to enhance nutrition value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.