Exercise Tips: आठवड्यातील ५ दिवस ४५ मिनिटे करा 'या' एक्सरसाइज, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 11:34 AM2018-12-21T11:34:48+5:302018-12-21T11:36:45+5:30
हिवाळा हा तसा तर वेगवेगळे पदार्थ खाण्याची चंगळ असलेला आणि फिरायला जाण्याचा ऋतू मानला जातो.
(Image Credit : Healthista)
हिवाळा हा तसा तर वेगवेगळे पदार्थ खाण्याची चंगळ असलेला आणि फिरायला जाण्याचा ऋतू मानला जातो. पण थंड वातावरणामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. वेगवेगळ्या समस्यांचा सामना वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना करावा लागतो. त्यामुळे योग्य आहार घेण्यासोबतच फिट कसं रहायचं हे एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
हॉलंडमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या महिला आठवड्यातून ५ दिवस साधारण ४५ मिनिटे एक्सरसाइज करतात. ज्या महिलांना सर्दी-पळसा आणि इतरही समस्या होत नाहीत. ४५ मिनिटांच्या एक्सरसाइजने त्यांचा वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होतो.
सर्दी-पळसा आणि खोकला
सर्दी-पळसा आणि खोकला ही या वातावरणातील कॉमन समस्या आहे. जर तुम्हालाही दररोज सकाळी उठून शिंका येत असतील, सर्दी झाल्यासारखं वाटत असेल तर फार काळजी करण्याची गरज नाही. ही समस्या अॅलर्जीमुळेही होऊ शकते. यासाठी हेल्दी आहार घेणे फायदेशीर ठरेल.
एक्सरसाइज फायदेशीर
डोकेदुखी, डोळ्यातून पाणी येणे, अंगदुखी, या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात ऐरोबिक्स, कॅलीस्थेनिक्स, योगाभ्यास आणि स्वीमिंग करु शकता. या एक्सरसाइज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.