दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा या 5 गोष्टींचा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 10:58 AM2018-06-11T10:58:21+5:302018-06-11T11:02:06+5:30
सकाळी योग्य नाश्ता न केल्यास दिवसभर चांगली एनर्जी मिळत नाही. त्यासोबतच काही आजारांचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात इतरांसाठी तर सोडाच स्वत:साठीही वेळ मिळत नाही. खासकरुन महिलांना अजिबातच वेळ मिळत नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना सकाळी घरातील कामं करता करता स्वत:साठी नाश्ता करायलाही वेळ नसतो. त्यामुळे जे हाताला लागेल ते खाऊन महिला घराबाहेर पडतात. हे असं वारंवार होणं त्या महिलांच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक आहे. सकाळी योग्य नाश्ता न केल्यास दिवसभर चांगली एनर्जी मिळत नाही. त्यासोबतच वेगवेगळ्या आजारांचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे सकाळी नाश्त्यात खालील गोष्टींचा समावेश आवर्जून करावा लागेल.
1) नारळ पाणी :
नारळ पाणी तुम्ही कधीही पिऊ शकता पण सकाळी नारळ पाणी पिण्याचे फायदे वेगळेच आहेत. नारळ पाण्याला एक कॅलरी ड्रिंकही म्हटलं जातं. यात अॅंटीऑक्सीडेंट्स, अमीनो-अॅसिड, एंजाइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आढळतात. या गुणांमुळे महिलांची इम्यून सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच नारळाच्या पाण्यामुळे त्वचाही तजेलदार दिसते. त्यासोबतच नारळाच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होतेे. त्यामुळे सकाळी नाश्ता करण्याची संधी मिळाली नाही तर नारळाचं पाणी आवर्जून प्यावे.
2) सफरचंद
रोज एक सफरचंद खावे असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. या फळामध्ये फ्लावनोईड हे अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळे हाडे आणखी मजबूत होतात. त्यासोबतच श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर ही समस्याही या फळाच्या सेवनाने दूर होते. त्यामुळे रोज सकाळी एक सफरचंद खावे.
3) दूध
दुधात अनेक आरोग्यदायी पोषक तत्वे असतात. त्यामुळे वय कोणतही असो रोज सकाळी एक ग्लास दूध प्यायल्यास तुम्हाला फायदा होतो. दुधामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते. दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे त्वचा, केस आणि हाडे मजबूत होतात. तसेच रोज एक ग्लास दूध प्यायल्यास अनेक आजार दूर राहतात.
4) काळे चणे
रात्री काळे चणे भिजवून ठेवून त्याचा सकाळी नाश्ता केल्यास चांगला फायदा मिळतो. काळे चणे खाल्ल्यास प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन अधिक प्रमाणात मिळतात. याने दिवसाची सुरुवात चांगली होते. दिवसभर थकवा जाणवत नाही. एका रिसर्चनुसार सकाळी एक वाटी भिजवलेले चणे खाल्लास चांगला फायदा मिळतो.
5) ड्रायफ्रूट्स
मिक्स ड्रायफ्रूट्स जसे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता एकत्र खाल्ल्यास फायदा होतो. ड्रायफ्रूट्समध्ये एनर्जीचा मोठा स्त्रोत असतो. त्यासोबतच ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आयुष्यही वाढतं. यांमध्ये फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन अधिक असतात. हे खाल्ल्याने महिलांचा हिमोग्लोबिन अधिक वाढतं.