पुरूषांसाठी संजीवनी ठरतात ही 5 फळं, हार्ट अटॅक अन् स्ट्रोकचाही राहणार नाही धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:29 AM2023-06-15T10:29:28+5:302023-06-15T10:30:06+5:30
5 Best Fruits For Men : वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच 5 फळं खाणं गरजेचं आहे.
5 Best Fruits For Men : जास्तीत जास्त पुरूष आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ते कामात बिझी असल्याचं किंवा ते फिट असल्याचं कारण देतात आणि निष्काळजी होतात. पण आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात आणि त्यांना याची कल्पनाही नसते. चुकीच्या सवयी आणि लाइफस्टाईलमुळे जास्तीत जास्त पुरूषांना हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो. ज्यामुळे कमी वयातच हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो.
वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच 5 फळं खाणं गरजेचं आहे. ही फळं शरीराला आवश्यक पोषक तत्व तर देतातच सोबतच ब्लड सर्कुलेशनही वेगाने होतं. त्याशिवाय पुरूषांची शक्ती वाढते.
अलिकडे पुरूषांना सगळ्यात जास्त हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, हार्ट फेल, किडनी डॅमेज, नसा डॅमेज होणे, लैंगिक समस्या अशा गोष्टींचा जास्त सामना करावा लागत आहे. अशात जर या समस्या होऊ नये असं वाटत असेल तर खालील फळं नियमित खाणं गरजेचं आहे.
डाळिंब
डाळिंबामध्ये पलीफेनॉल अॅंटी-ऑक्सिडेंट आणि नायट्रेट असतं. डाळिंब खाल्ल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि मांसपेशीचे टिश्यू हेल्दी होतात. अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, व्यायाम करण्याच्या 30 मिनिटांआधी डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने नसा रिलॅक्स होतात.
रताळे
रताळे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. यातही अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व भरपूर असतात. तसेच यात नायट्रिक ऑक्साइड असतं. जे नसांना मोकळं करून ब्लड सर्कुलेशन वेगाने करतं.
आंबट फळं
संत्री, लिंबू, चिंचा यांसारख्या आंबट फळांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फ्लेवोनोइड्स असतात. जे नसांचं आकुंचन कमी करतात. याने ब्लड फ्लो वेगाने होतो. परिणामी हाय बीपीची समस्य होत नाही. याने पुरूषांना खूप फायदा मिळतो.
कलिंगड आणि द्राक्ष
कलिंगडाचे आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे होतात. यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यात एक असंही तत्व असतं ज्याने नसा मोकळ्या होतात. तसेच द्राक्षांमध्ये प्लेटलेट्सना मदत करणारे काही तत्व असतात. ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होत नाही आणि ब्लड फ्लो वेगाने होतो.