लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:52 AM2019-04-09T11:52:28+5:302019-04-09T11:52:55+5:30

आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या दिवसात आता लघवी करताना जळजळ किंवा त्रास होण्याची समस्या जास्त प्रमाणात होते.

5 best home remedies for urinating in urine | लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय!

लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय!

googlenewsNext

(Image Credit : www.keckmedicine.or)

आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या दिवसात आता लघवी करताना जळजळ किंवा त्रास होण्याची समस्या जास्त प्रमाणात होते. यूरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे लघवी करताना तुम्हाला जळजळ होऊ शकते. ही समस्या जास्त प्रमाणात महिलांना होते कारण त्यांनाच यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सर्वात जास्त होतं. ही समस्या या दिवसात जास्त होते कारण या दिवसात लोक कमी पाणी पितात. तुम्हालाही ही समस्या होत असेल तर ५ घरगुती उपायांनी ही समस्या दूर केली जाऊ शकते. 

नारळाचं पाणी 

लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी नारळाचं पाणी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. तसेच नारळाच्या पाण्याने शरीराला इतरही अनेक फायदे होतात. नारळाच्या पाण्यात भरपूर गुणकारी तत्त्व असतात. ज्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ, वेदना आणि त्रासाची समस्या दूर करू शकता. ही समस्या डिहायड्रेशनमुळे होते. यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जास्तीत जास्त नारळाचं पाणी प्यावे.

काकडी खा

लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी दुसरा सर्वात चांगला उपाय म्हणजे काकडी. काकडीमध्ये असलेल्या एल्कलाइन तत्वाने शरीर आतून थंड राहतं. तसेच याने पचनक्रियाही चांगली राहते. इतकेच नाही तर यात अनेकप्रकारचे अॅंटीऑक्सिडेंट्सही असतात. त्यामुळे या दिवसात काकडी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे काकडीचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा.

थंड दूध  

उन्हाळ्यात लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे थंड दूध. थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवी करताना होणारी जळजळही दूर होईल. या थंड दुधात तुम्ही वेलची पावडरही मिश्रित करू शकता.

दही खा

जर तुम्हाला तुम्हाला होणाऱ्या या समस्येपासून सुटका हवी असेल तर या दिवसात भरपूर दही खावे. याने लघवी करताना होणारी जळजळही दूर होते. दह्यामध्ये शरीरातील खराब बॅक्टेरिया नष्ट करण्याची आणि चांगले बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता असते. तसेच याने योनीमध्ये संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियालाही दूर केलं जातं. 

संत्री आणि लिंबू

लघवी करताना होणारी जळजळ ही समस्या दूर करताना व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. ही समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ आपल्या शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढवून बॅक्टेरियाची वाढ रोखली जाते. याने इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. फळ आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे लिंबाचा रस, संत्री, कीवी फळ, द्राक्ष आणि आवळा ही फळे खावीत. 

Web Title: 5 best home remedies for urinating in urine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.