उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी 'हे' 5 स्नॅक्स ठरतात फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:03 PM2019-03-31T18:03:26+5:302019-03-31T18:04:28+5:30
उन्हाळ्यामध्ये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. वजन कमी करण्यासाठी उन्हाळा अत्यंत फायदेशीर ठरतो. कारण या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही.
उन्हाळ्यामध्ये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. वजन कमी करण्यासाठी उन्हाळा अत्यंत फायदेशीर ठरतो. कारण या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही. त्यामुळे पेय पदार्थांच्या मदतीने वजन कमी करणं सहज शक्य होतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही खास स्नॅक्सबाबत माहिती करून घेणं अत्यंत फायदेशीर ठरेल. कारण आपण जेव्हा हेल्दी डाएट घेतो, त्यावेळी संध्याकाळचा नाश्ता किंवा जेवणाच्या मधल्या वेळेत भूक लागते. ही वेळ अशी असते ज्यावेळी लोक सर्वात जास्त अनहेल्दी पदार्थांचं सेवन करतात. जे त्यांचं वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. वजन कमी करणं आणखी सोपं करण्यासाठी आहारामध्ये हेल्दी स्नॅक्सचा समावेश करावा. जाणून घेऊया 5 हेल्दी स्नॅक्सबाबत...
फळभाज्या
जेव्हाही तुम्हाला खाण्याची इच्छा होते त्यावेळी चिप्स, समोसे यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवतं. वजन जर कमी करायचं असेल तर तुम्हाला हेल्दी डाएट घेणं आवश्यक ठरतं. उन्हाळ्यामध्ये फळभाज्या खाणं फायदेशीर ठरतं. फळभाज्यां पचण्यास अत्यंत फायदेशीर असून प्रोटीन, व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळून येतं. उन्हाळ्यामध्ये फळभाज्यांपासून तयार करण्यात येणारं स्नॅक्स वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
रोस्टेड चणे आणि छोले
रोस्टेड चणे चिप्सप्रमाणे कुरकुरीत असतात. परंतु यामध्ये प्रोटीम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. हे तयार करण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चिमुटभर मीठ आणि जीरं बेक्ड करून घ्या. हे खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
अंड्यापासून तयार केलेले पदार्थ
अंड खाल्याने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते. हे भूक वाढविणारे हार्मोन्स कमी करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त अंड्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं. तुम्ही अंड्याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वात आधी तुमच्या भूकेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं.
पनीर आणि दालचीनी
सर्वात आधी एक ब्राउन ब्रेड घेऊन त्यावर लो फॅट पनीरच्या चूऱ्याची एक लेयर तयार करा. त्यावर दालचीनी पावडर टाका. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेच आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. डार्क चॉकलेट पचनक्रियेला 70 टक्क्यांनी स्लो करतं त्यामुळे तुम्हाला लगेच भूक लागत नाही. तसेच पोटाच्या समस्याही दूर रहातात.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपयोगी ठरतं.