हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस पिण्याचे 5 मोठे, अनेक समस्या होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:49 AM2023-10-31T09:49:53+5:302023-10-31T09:50:13+5:30

Beetroot and carrot juice benefits : हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. फायदे वाचून व्हाल अवाक्...

5 big health benefits to drink beetroot and carrot juice in Winter | हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस पिण्याचे 5 मोठे, अनेक समस्या होतील दूर!

हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस पिण्याचे 5 मोठे, अनेक समस्या होतील दूर!

Beetroot and carrot juice benefits : आता थंडीला बऱ्यापैकी सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये शरीराची इम्यूनिटी मजबूत ठेवणं फार गरजेचं असतं. यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. यातील एक म्हणजे बीट आणि गाजराचा ज्यूस. या दोन्ही ज्यूसने शरीराला 5 जबरदस्त फायदे मिळतात.

कॅन्सरमध्ये फायदा

आयुर्वेदाच्या जाणकारांनुसार, हिवाळ्यात बीट आणि गाजराचा ज्यूस प्यायल्याने कॅन्सर कंट्रोल करण्यास बरीच मदत मिळते. यात असे अनेक अॅंटी कॅन्सर गुण असतात, ज्यामुळे शरीरात कॅन्सरच्या कोशिका वाढणं कमी होतं.

ब्लड प्रेशर कंट्रोल

ज्या लोकांना हाय बीपीची समस्या राहते, त्यांना हिवाळ्यात गाजर आणि बीटाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. यात असलेल्या मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमने ब्लड प्रेशर संतुलित राहतं.

वजन होईल कमी

ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांनी रोज बीट आणि गाजराचा एक ग्लास ज्यूसचं सेवन करावं. यातील फायबर आणि कमी कॅलरीमुळे फॅट कमी होऊन शरीर फीट राहतं.

रक्ताची कमतरता होईल दूर

एनीमिया म्हणजे रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी बीट आणि गाजर रामबाण मानलं जातं. या दोन्हींमध्ये आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात रक्त वेगाने वाढतं.

पचन तंत्र होतं मजबूत

आयुर्वेदाच्या जाणकारांनुसार, गाजर आणि बीटामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पचन तंत्र चांगलं राहतं. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या होत नाहीत.

Web Title: 5 big health benefits to drink beetroot and carrot juice in Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.