रात्री झोपण्याआधी चुकूनही खाऊ नये 'ही' फळं, फायदे सोडा उलट होईल नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:50 AM2024-05-01T09:50:28+5:302024-05-01T09:51:20+5:30
Healthy Tips: आज आम्ही तुम्हाला अशा फळांबाबत सांगणार आहोत जी तुम्ही रात्री खाणं टाळली पाहिजेत.
Healthy Tips: सामान्यपणे सगळेच लोक आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करतात ज्यापासून त्यांना शरीराला फायदे मिळतील. वेगवेगळी फळं खाणं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जातात. पण फळांचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. फळं खाण्याची वेळ जर पाळली गेली नाही तर फायद्यांऐवजी नुकसानही होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा फळांबाबत सांगणार आहोत जी तुम्ही रात्री खाणं टाळली पाहिजेत. ही फळं रात्री खाल्ली तर आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. या फळांमुळे वजन वाढू शकतं, शुग लेव्हल वाढू शकते आणि पोटही खराब होऊ शकतं.
रात्री खाऊ नये ही फळं
द्राक्ष
झोपण्याआधी रात्री द्राक्ष खाणं टाळलं पाहिजे. या फळामध्ये सिट्रिक असल्याने हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. त्याशिवाय द्राक्षांमध्ये शुगरचं प्रमाणही अधिक असतं ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
कलिंगड
उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक कलिंगड खाणं पसंत करतात. पण झोपण्याआधी कलिंगड खाणं टाळलं पाहिजे. कारण याच्या सेवनाने ब्लॅडर फुल होतं आणि पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागू शकतं. ज्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं होऊ शकतं.
संत्री
व्हिटॅमिन सी भरपूर असलेली संत्री आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. पण रात्री यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. असं केलं तर तुम्हाला असहज वाटू शकतं. तसेच पोटदुखीची समस्याही होऊ शकते. हे दिवसाच्या वेळीच खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
पेरू
भरपूर फायबर असलेलं पेरू हे फळं दिवसा खाल्लं तर वजन कमी करण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. पण रात्री जर हे फळ खाल्लं तर प्रभाव उलटा पडू शकतो. फायबर भरपूर असल्याने रात्री जर हे फळ खाल्लं तर ते पचायला भरपूर वेळ लागतो. ज्यामुळे पोटदुखीची समस्या होऊ शकते.
केळी
केळींमध्ये जवळपास 150 कॅलरी असतात आणि शरीराला 37.5 कार्बोहायड्रेट्स मिळू शकतात. जर तुम्ही रात्रीच्या वेळी एक किंवा त्यापेक्षा जास्त केळी खाऊन झोपत असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो. वजन वाढू नये असं वाटत असेल तर केळी नेहमी दिवसा खावीत.