भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने 'या' समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:28 AM2024-05-21T10:28:31+5:302024-05-21T10:28:56+5:30

Ginger Benefits :आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

5 health benefits of eating raw ginger | भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने 'या' समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन

भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने 'या' समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन

Ginger Benefits : आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आल्याचे फायदे

आल्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला बरं वाटत नसेल की वेदना होत असेल तर आल्याचं सेवन करून या समस्या दूर करू शकता. त्यासाठी तुम्ही आल्याचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता.

मळमळ होत असेल तर...

आल्याचा सगळ्यात कॉमन वापर मळमळ दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आल्यामध्ये असे तत्व असतात जे पोटदुखी वाढवणारे रिसेप्टर्स ब्लॉक करण्यास मदत करतात. जे नंतर मळमळीचं कारण बनतात. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, आल्याचं नियमितपणे सेवन केल्याने कीमोथेरपीसंबंधी लक्षणं कमी करण्यास मदत मिळते.

प्रेग्नेंसीमध्ये फायदेशीर

गर्भावस्थेच्या सुरूवातील आलं मॉर्निंग सिकनेस दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. गर्भवती महिलांची मळमळ दूर करण्यास आल्याची खूप मदत मिळते.

सूज आणि डायजेशनमध्ये मदत

आल्याचं सेवन केल्याने अन्न पचवण्यास मदत मिळते. आल्यामध्ये आढळणारं तेल पोट फुगण्यासारखी समस्या दूर करतं. ज्या लोकांचं पोट सेन्सिटिव्ह आहे किंवा मसालेदार खाण्याबाबत सेन्सिटिव्ह आहे त्यांनी आलं खाताना काळजी घेतली पाहिजे. आलं पोटातील सूज आणि इतर पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करतं.

सर्दी

आल्याचं सेवन केल्यान आपलं इम्यून सिस्टीम चांगलं होतं. बरेच लोक सर्दी झाल्यावर आल्याचं आणि मधाचं सेवन करतात. आल्यामध्ये जिंजरोल नावचं तत्व असतं जे घशा अडकलेला कपही दूर करतं. तसेच कोरडा खोकला आणि घशाची खवखवही आल्यामुळे दूर होते.

वेदना

आल्यामध्ये सूज कमी करणारे गुण असतात. खासकरून जेव्हा तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना होतात त्या आल्यामुळे दूर होऊ शकतात. रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनाही दूर करण्यास याने मदत मिळते. 

Web Title: 5 health benefits of eating raw ginger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.