वजन कमी करण्याचं टेंशन सोडा, बारीक होण्यासाठी दिवसातून फक्त इतकी पावलं चाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:49 PM2020-02-18T16:49:03+5:302020-02-18T16:58:48+5:30
इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही
वजन कमी करण्यासाठी फक्त पायी चालणं पुरेसं नसतं तर त्याचसोबत व्यायाम करणं सुद्धा तितंकच महत्वाचं आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे १० हजार पाऊल चालण्यामुळे हेल्दी राहण्यासोबतच त्यांचे वजन सुद्धा कमी होते.
(Image credit- CNN.com)
ब्रिटेनच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे शोधनकर्त्यांकडून १२० कॉलेजेसमध्ये स्टुडेंट्सवर अध्ययन करण्यात आले. अभ्यासकांनी वेगवेगळया स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहा दिवसांमध्ये त्यांना दहा हजार बारा हजार आणि पंधरा हजार पाऊलं चालण्यास सांगितले. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.
अभ्यासकांच्यामते प्रामुख्याने या गोष्टीवर लक्ष देण्यात आले की १० हजार पाऊल चालल्यानंतर वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यांनी असं सांगितलं की सुरूवातीच्या काळात त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे वजन एक ते चार किलोपर्यंत कमी झाले होते. अध्ययनातील अभ्यासातून असं दिसून आलं कि तुम्ही चालत असताना पावलांवर जर लक्ष ठेवलं तर शारीरिक समस्या कमी होतील. तसंच वजन कमी होईल. ( हे पण वाचा-पोट फुगण्याला गॅस समजण्याची करू नका चुक, 'या' गंभीर आजारांचा असू शकतो संकेत!)
दररोज चालण्याचे फायदे
दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते.
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो.
वेगात चालल्यामुळे ताण-तणाव सुद्धा कमी होतो. ( हे पण वाचा- नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ)