उन्हाळ्यामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी करा फक्त 'ही' 5 कामं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 07:13 PM2019-05-10T19:13:42+5:302019-05-10T19:19:34+5:30
वातावरण बदलांमुळे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं, गरम हवा यांमुळे वाढलेलं तापमान, घराबाहेर सुरू असणारी गरम हवा, हे सर्व मुलांना आजारी करू शकतात.
वातावरण बदलांमुळे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं, गरम हवा यांमुळे वाढलेलं तापमान, घराबाहेर सुरू असणारी गरम हवा, हे सर्व मुलांना आजारी करू शकतात. अशातच सर्व पालक मुलांना उन्हाळ्यातील उकाड्यापासून वाचवण्यासाठी त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. पण मुलं किती वेळ घरात बसून राहतील? ते खेळण्यासाठी घरातून बाहेर पडतातच. अशातच त्यांना उन्हाळ्यातील समस्यांपासून वाचवण्यासाठी काही टिप्स मदत करतील. जाणून घेऊया त्या टिप्सबाबत...
1. अधिकाधिक पाणी पिण्यास सांगा
मुलं जिथे दिवसभर काही खाण्यासाठी सांगितलं तर नाक-तोंड मुरडतात, तेच पाण्यापासूनही दूर रहातात. या सर्व गोष्टी त्यांच्या मूडवर अवलंबून असतात. पण जर उन्हाळ्यामध्ये मुलांना गरम हवा, सन स्ट्रोक यांपासून वाचवायचं असेल तर अधिकाधिक पाणी पिण्यास सांगा. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहातं.
2. ज्यूस, लिंबू पाणी पिण्यास सांगा
जर मुलं पाणी पिण्यासाठी नाटकं करत असतील तर त्यांना इतर पेय पदार्थ पिण्यासाठी द्या. मुंलाना तुम्ही लिंबू पाणी, फ्लेवर्ड सरबत, ज्यूस यांसारखे पदार्थ पिण्यासाठी देऊ शकता. मुलांचं रूटिन सेट करा. त्यानुसार त्यांना पेय पदार्थ पिण्यासाठी द्या.
3. सनस्क्रिन
तुम्ही कितीही थांबवलं तरिही मुलं खेळण्यासाठी घरातून बाहेर पडणारचं. असातच त्यांच्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रिन मदत करेल. त्यामुळे मुलं खेळण्यासाठी बाहेर जात असतील तेव्हा त्यांना सनस्क्रिन लावायला विसरू नका.
4. कॉटनचे कपडे परिधान करा
उन्हाळ्यामध्ये जेवढं शक्य असेल तेवढं मुलांना कॉटनचे कपडे वेअर करायला सांगा. कारण कॉटनचे कपडे घाम लगेच शोषून घेतात. तसेच गरम हवा आणि सूर्याची किरणं थेट त्यांच्या त्वचेवर पडणार नाहीत. तसेच शक्यतो हलक्या रंगांचे कपडे मुलांना वेअर करण्यासाठी द्या.
5. डासांपासून रक्षण करा
उन्हाळ्यामध्ये मच्छर वाढतात. ते चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे यांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी डास दूर ठेवणाऱ्या क्रिम्स किंवा लोशन्स लावा. मुलांनी कितीही नाही म्हटलं तरिही त्यांना घरातून बाहेर पाठवण्याआधी क्रिम लावा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.