'या' ५ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये शेंगदाणे, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:56 AM2024-09-28T10:56:09+5:302024-09-28T10:56:39+5:30

Side Effects Of Peanut: शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही लोकांसाठी यांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.

5 people should not eat peanuts know the side effects | 'या' ५ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये शेंगदाणे, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

'या' ५ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये शेंगदाणे, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

Side Effects Of Peanut:  शेंगदाण्यांना गरीबांचे काजू असं म्हटलं जातं. कारण यात भरपूर पोषक तत्व असतात. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही लोकांसाठी यांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कुणासाठी शेंगदाणे घातक?

1) एलर्जी असलेले लोक

शेंगदाण्यांची एलर्जी फारच कॉमन आहे आणि अनेकांमध्ये ही एलर्जी गंभीर असू शकते. शेंगदाण्यांचं सेवन केल्याने त्यांना खाज, श्वास घेण्यास त्रास आणि एनाफिलेक्सिससारखी समस्याही होऊ शकते. जर तुम्हाला शेंगदाण्यांपासून एलर्जी असेल तर याचं सेवन अजिबात करू नका.

२) वजन कमी करणारे लोक

शेंगदाण्यांमध्ये फॅट आणि कॅलरी भरपूर प्रमाणात असतात. यातून हेल्दी फॅट मिळतं. पण जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर शेंगदाण्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढू शकतं.

३) पचनासंबंधी समस्या

काही लोकांना शेंगदाण्याचं सेवन केल्याने पचनासंबंधी समस्या जसे की, पोटात दुखणे, अपचन आणि डायरिया यांसारख्या समस्या होऊ शकतात. शेंगदाण्यांमध्ये हाय फायबर असतं, जे काही लोकांना पचवण्यास अवघड जातं. अशा लोकांनी शेंगदाणे खाऊ नयेत.

४) संधिवात किंवा यूरिक अ‍ॅसिड

शेंगदाण्यांमध्ये हाय प्रोटीन असतं, ज्यामुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढू शकतं. ज्या लोकांना संधिवाताची समस्या आहे त्यांनी शेंगदाण्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कारण यांनी स्थिती आणखी खराब होऊ शकते.

५) ब्लड प्रेशरचे रूग्ण

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल, तर तुम्ही शेंगदाण्यांचं सेवन काळजीपूर्वक केलं पाहिजे. मीठ टाकलेले शेंगदाणे खाल्ल्याने तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. अशात तुम्ही मीठ नसलेले शेंगदाणे खाऊ शकता.

Web Title: 5 people should not eat peanuts know the side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.