हॅन्ड सॅनिटायझरचा वापर लगेच थांबवण्याची ५ कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:43 AM2018-08-10T11:43:53+5:302018-08-10T11:45:06+5:30
तुम्हीही सॅनिटायझर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका रिसर्चनुसार, सॅनिटायझरचा जितका आपल्या फायदा होत नाही त्यापेक्षा अधिक त्याने नुकसान होतं.
हात स्वच्छ करण्यासाठी किंवा हातावरील किटाणू नष्ट करण्यासाठी अलिकडे सॅनिटायझरचा सर्रास वापर होताना दिसतो. अनेकांना तर सॅनिटायझरची सवय झाली आहे. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तुम्हीही सॅनिटायझर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका रिसर्चनुसार, सॅनिटायझरचा जितका आपल्या फायदा होत नाही त्यापेक्षा अधिक त्याने नुकसान होतं.
फायदे कमी तोटे जास्त
जर तुम्हाला वाटत असेल की सॅनिटायझरचा एक थेंब तुमच्या हातांवरील किटाणू नष्ट करत असेल तर हे खरं नाहीये. जास्तीत जास्त सॅनिटायझरमध्ये ६० टक्केच अल्कोहोल असतं जे किटाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुरेसं नसतं.
ट्रायक्लोसॅनचं घातक प्रमाण
जर तुमच्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असेल तर त्यात ट्रायक्लोसॅनचं प्रमाण नक्कीच जास्त असणार. ट्रायक्लोसॅन एक पावरफुल अॅंटीबॅक्टेरिअल एजंट आहे. याने तुम्हाला सर्दी किंवा खोकला यांसारख्या समस्या अधिक होऊ शकतात.
त्वचेसाठी धोकादायक सॅनिटायझर
हॅन्ड सॅनिटायझरचा सतत वापर तुमच्या त्वचेसाठी घातक आहे. याने तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या होऊ शकतात. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर लगेच हॅन्ड लोशनचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
सॅनिटायझरचा सुगंध विषारी?
जास्तीत जास्त सॅनिटायझरमध्ये फालेट्स आढळतं, जे विषारी असल्याचं सांगितलं जातं. हे हुंगल्याने किंवा कोणत्याप्रकारे शरीरात गेलं तर याने नुकसान होऊ शकतं. याचा सर्वात जास्त प्रभाव फर्टिलिटीवर पडतो.
रोगप्रतिकारकशक्ती होते कमजोर
असे आढळले आहे की, सॅनिटायझर बॅड बॅक्टेरियासोबतच गुड बॅक्टेरियाही नष्ट करतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होऊ शकते.