अंडरगारमेंट्समुळे होतात हे ५ गंभीर आजार, अशी घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:35 AM2018-08-23T11:35:55+5:302018-08-23T11:45:24+5:30
पावसाच्या दिवसात तर ही समस्या सर्रास बघायला मिळते. महिलांना तर या समस्येबाबत नेहमी जागरुक असावे. चला जाणून घेऊ काय होऊ शकतात याचे नुकसान...
अंडरगारमेंट्सचा विषय निघाला की, सर्वांचं लक्ष आधी महिलांकडे जातं. घरातही महिला आपल्या अंडरगारमेंट्सबाबत घाबरलेल्या, लाजताना दिसतात. त्यामुळेच काही महिला या आपले अंडरगारमेंट्स खुल्या जागेत आणि उन्हात वाळत घालून शकत नाहीत. पण अंडरगारमेंट्सबाबत अनेकजण फारसे गंभीर बघायला मिळत नाहीत. जर अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे सुकले नाही तर त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. पावसाच्या दिवसात तर ही समस्या सर्रास बघायला मिळते. महिलांना तर या समस्येबाबत नेहमी जागरुक असावे. चला जाणून घेऊ काय होऊ शकतात याने नुकसान...
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
सामान्यता ही लघवीमुळे होणारी समस्या असते पण याचं मुख्य कारण हायजीन असतं. जर तुमचे अंडरगारमेंट्स चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुकलेले नसतील तर यूटीआय होण्याचा धोका असतो. बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार फारच धोकादायक असतो. यापासून वाचण्यासाठी अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे स्वच्छ करा आणि उन्हामध्ये वाळत घाला.
गर्भाशयात इन्फेक्शन
महिलांना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमधून इन्फेक्शनची भीती असते त्यामुळे त्यांना सतत काळजी घ्यावी लागते. महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये कोणत्याही रोगाला जन्म देऊ शकतं. हे फार घातक ठरु शकतं.
स्कीन इन्फेक्शन
स्कीनमध्ये संक्रमण होण्याचं मुख्य कारण हायजीनची कमतरता असतं. जर कपडे पूर्णपणे सुकलेले नसतील ते थोडे ओले असतील तर इन्फेक्शनचा धोका वाढतो. प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूचू स्कीन फार सॉफ्ट आणि सेन्सिटीव्ह असते त्यामुळे इथे इन्फेक्शनची भीती जास्त असते.
खाज येणे
स्कीनच्या आजारांमध्ये खाज येणे ही समस्या सर्वात खराब मानली जाते. एकदा खाज कुणाला झाली तर ती बरी होण्यास बराच वेळ घेते. याव्यतिरिक्त खाज ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वेगाने पसरते.
किडनी स्टोन
तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण अंडरगारमेंट्समुळे किडनी स्टोन होण्याची शक्यताही असते. पण यामागचं कारण बॅक्टेरिया असतं. बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झाल्यास सर्वात पहिले ते लिव्हर आणि किडनीला कचाट्यात घेतं. त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.