प्रभावी 'हेल्थ इंडिकेटर' आहे तुमचं नाक; नाकातील 'हे' बदल असू शकतात गंभीर आजारांची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:42 PM2020-05-15T12:42:11+5:302020-05-15T12:43:18+5:30

आपलं नाक खूप संवेदनशील असतं. आज आम्ही तुम्हाला नाकात होत असलेल्या  बदलांबाबत सांगणार आहोत.

5 Signs your Nose can reveal about your health and help in early detection of diseases myb | प्रभावी 'हेल्थ इंडिकेटर' आहे तुमचं नाक; नाकातील 'हे' बदल असू शकतात गंभीर आजारांची लक्षणं

प्रभावी 'हेल्थ इंडिकेटर' आहे तुमचं नाक; नाकातील 'हे' बदल असू शकतात गंभीर आजारांची लक्षणं

googlenewsNext

(image credit- healthline)

आपल्या शरीरात जितके अवयव आहेत. प्रत्येकाचं खास महत्व आहे. तुम्ही विचार करत असाल की ,श्वास घेणं आणि एखाद्या गोष्टींचा वास जाणवणं इतकंच नाकाचं कार्य असेल. पण नाकाद्वारे शरीरातील अनेक आजारांना ओळखता येऊ शकतं. कारण आपलं नाक खूप संवेदनशील असतं. आज आम्ही तुम्हाला नाकात होत असलेल्या  बदलांबाबत सांगणार आहोत.

नाकातून रक्त येणं

जर एखाद्या व्यक्तीच्या नाकातून अचानक रक्त येत असेल तर अनेक कारणं असू शकतात. सगळ्यात महत्वाचं कारणं म्हणजे ड्राय सायनस.  ही समस्या उन्हाळ्यात जास्त जाणवते. कारण त्यावेळी वातावरणात खूप गरमी असते. अशा स्थितीत जास्त गरम आणि आंबट पदार्थ खाल्यामुळे नाकालातील नसांना इजा पोहोतून रक्त यायला सुरुवात होते. 

नाक लाल होणं

नाक लाल होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. साधारणपणे ज्या लोकांच्या त्वचेचा रंग जास्त गोरा असतो. त्यांना राग आल्यानंतर किंवा जास्त खाजवल्यामुळे नाक लाल होतं. याव्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला यांमुळे नाक लाल होण्याची समस्या उद्भवते. सतत नाक लाल होणं. रायनोफायम आणि रोजेसिया या आजाराचे संकेत असू शकतात.

वास न येणं

अचानक एखाद्या व्यक्तीला वास येत नसेल तर आजारपणामुळे ही लक्षणं असू शकतात. सर्दी, तापामुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर तुम्ही वास घेऊ शकतं नाही. हे लक्षण डायबिटिसच्या आजाराचं सुद्धा असू शकतं. शरीरातील वाढत जाणारी साखरेची पातळी वास घेण्याची  क्षमता कमी करत असते. वास न येणं हे कारणं कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं सुद्धा लक्षण असू शकतं. याशिवाय अल्जायमर, पार्किन्सस या आजारांचा सुद्धा धोका असू शकतो. 

नाकातून जर पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा म्यूकस बाहेर येत असेल तर बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनचं कारण असू शकतं. पाण्यासारखा किंवा पांढरा रंग असल्यास हवा प्रदूषणाचा परिणाम असू शकतो. काळा म्यूकस निघत असेल तर श्वसन तंत्रात फंगल इन्फेक्शन असू शकतं. 

(युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय)

(कोरोनाला रोखून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या 'या' आयुर्वेदिक औषधाची सर्वत्र होत आहे चर्चा)

Web Title: 5 Signs your Nose can reveal about your health and help in early detection of diseases myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.