लॉकडाऊननंतर जिममध्ये व्यायाम करण्याआधी 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; तरच संसर्गापासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 03:27 PM2020-07-31T15:27:05+5:302020-07-31T15:28:34+5:30

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोक आपापल्या घरी बसून होते. जिमचा आणि व्यायामाचा फारसा संबंध लॉकडाऊनच्या काळात आला नाही. त्यामुळे आता जीम सुरू होणार  ही बातमी ऐकून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

5 things to keep in mind before exercising in the gym after a lockdown | लॉकडाऊननंतर जिममध्ये व्यायाम करण्याआधी 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; तरच संसर्गापासून लांब राहाल

लॉकडाऊननंतर जिममध्ये व्यायाम करण्याआधी 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; तरच संसर्गापासून लांब राहाल

Next

अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. भारत  सरकारने अनलॉक ३.० मध्ये फिटनेस क्षेत्रासाठी काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. काही नियमांसह ५ ऑगस्टपासून जिम सुरू करण्यास परवागनी दिली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोक आपापल्या घरी बसून होते. जिमचा आणि व्यायामाचा फारसा संबंध लॉकडाऊनच्या काळात आला नाही. त्यामुळे आता जीम सुरू होणार  ही बातमी ऐकून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

कारण सतत तीन महिने घरात बसून वजन वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवलाी आहे. पण  कोरोनाचं संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबवलेलं नाही. दिवसेंदिवस संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी जिमला जाताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  व्यायामापूर्वी  काहीती खायला हवं. परंतु हा आहार देखील एकदम हलका असावा. जड अन्न खाऊ नये. शिवाय खाऊन लगेच व्यायाम न करता ते पचण्यास थोडा वेळ देऊन मग व्यायामाला सुरुवात करावी.

दररोज जीमला जाण्याची वेळ निश्चिच ठेवा, ज्यावेळी कमी लोक जीमला येत असतील अशावेळी जाण्याचा प्रयत्न करा. जास्त गर्दी होत असल्यास जीमला जाणं टाळून घरीच व्यायाम करा. 

जिम ट्रेनरशी बोलून एरियानुसार लोकांची वेळ निश्चित करून घ्या. सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक तासात ठराविक संख्येने लोकांना जीममध्ये प्रवेश करण्याची परवाानगी  असावी. 

जिमला जाण्यापूर्वी झोप जावी  म्हणून अनेकजण चहा-कॉफी घेतात, परंतु असे करणे शक्यतो टाळा. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता झपाट्याने वाढते आणि शरीरातील उर्जा लवकर संपू शकते. परिणामी शरीर लवकर थकून जातं.

जर तुमची तब्येत बरी नसेल, सौम्य लक्षणं दिसत असतील तर जीमला जाणं टाळा. वर्कआऊट करताना,  चालताना किंवा धावताना मास्कचा वापर केल्यामुळे हृदयाचे ठोके जलद गतीने होण्याची शक्यता असते. त्यामुळे मास्कचा वापर व्यायाम करताना टाळा.  त्यामुळे थकवा येणं, दम लागणं असा त्रास उद्भवू शकतो. 

कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान ५ मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग जरूर करावे. तसेच कोणताही व्यायाम प्रकार एकदम करू नये. सावकाश सुरुवात करून मगच त्यात वाढ करावी.

खूप दिवसांनी व्यायाम करत असल्यामुळे अति उत्साहात जास्त वजन उचलू नका. झेपले एव्हढंच वजन उचला. आधी ट्रेनरचा सल्ला घेऊनच मग व्यायाम कसा करायचा ते ठरवा.

कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: 5 things to keep in mind before exercising in the gym after a lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.