5 गोष्टींवरून कळतं डायबिटीस डॅमेज करत आहे किडनी, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:39 PM2023-12-11T16:39:31+5:302023-12-11T16:40:08+5:30
डायबिटीसमुळे हार्ट डिजीज, हार्ट फेलिअर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. डायबिटीसचा सगळ्यात गंभीर प्रभाव किडन्यांवर पडतो.
डायबिटीस एक गंभीर समस्या आहे आणि भारतात ती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या एका रिपोर्टनुसार, 101 मिलियन भारतीय डायबिटीससोबत जगत आहेत आणि इतर 136 मिलियन लोक प्री-डायबिटीसच्या जाळ्यात आहेत. डायबिटीस आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचं मूळ आहे.
डायबिटीसमुळे हार्ट डिजीज, हार्ट फेलिअर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. डायबिटीसचा सगळ्यात गंभीर प्रभाव किडन्यांवर पडतो. डायबिटीस झाल्यावर किडनीचा आजार होण्याचा धोका असतो. असं मानलं जातं की, जवळपास तीनपैकी एक डायबिटीस पीडित किडनीच्या आजाराने पीडित असतो.
एका आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर मोठा चान्स आहे की, वाढलेल्या ब्लड शुगरमुळे किडनी डॅमेज होऊ शकते. लक्षात घ्या की, डायबिटीसचा किडन्यांवर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो आणि किडन्यांना डॅमेज होण्यापासून वाचवायचं असेल तर खालील उपाय करू शकता.
डायबिटीसमध्ये क्रोनिक किडनी रोगाचा धोका वाढू शकतो. हाय ब्लड शुगर लेव्हल किडनीच्या कार्याला प्रभावित करू शकतं. याने हाय ब्लड प्रेशरचाही धोका राहतो. ब्लड प्रेशर किडनीच्या आतील नाजूक रक्तवाहिन्यांवर दबाव टाकतं. ज्यामुळे जास्त नुकसान होतं. त्याशिवाय डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलही अधिक राहतं. ज्यामुळे किडन्यांचं नुकसान होतं.
डायबिटीसमध्ये किडनी खराब होण्याचं लक्षण
डायबिटीस झाल्यावर किडनीचा आजार गपचूप सुरू होतो आणि सुरूवातीला कोणतीही लक्षण दिसत नाहीत. जसजसा आजार वाढतो व्यक्तीच्या पायांवर सूज आणि दम लागणे, हाडांचा आजार, मेटाबॉलिक एसिडोसिससारखे इलेक्ट्रोलाइट डिजीज, अनकंट्रोल ब्लड प्रेशरसारखी लक्षण दिसू शकतात.
डाएटची घ्या काळजी
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आपल्या डाएटची खास काळजी घ्या. ब्लड प्रेशर आणि किडनीचं कामकाज व्यवस्थित करण्यासाठी हाय सोडिअम आणि हाय पोटॅशिअम असलेले खाद्य पदार्थांचं सेवन कमी करा. प्रोटीनचं सेवन कमी करा कारण याने किडनीवर जास्त दबाव पडतो.
एक्सरसाइज गरजेची
रोज एक्सरसाइज केल्याने इन्सुलिन रेसिस्टेंटमध्ये सुधारणा होते. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहतं आणि किडनीचा आजार सीकेडला मॅनेज करण्यास मदत मिळते.
ब्लड प्रेशर कंट्रोल करा
डायबिटीसमुळे रक्त वाहिन्यांच्या भींती कठोर टणक होतात, ज्यामुळेहाय बीपी होतं. यामुळे रक्त वाहिन्यांना रक्त फिल्टर करणं आणि ते किडन्यांपर्यंत ऑक्सीजन व पोषक तत्व पोहोचवण्यास समस्या होतात.
कोलेस्ट्रॉल कमी करा
डायबिटीसमुळे नेहमीच बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतं. डायबिटीसचा प्रभाव लिपिड प्रोफाइल, हृदय, मेंदू आणि किडन्यासहीत खालच्या अवयवांवरही पडतो. डायबिटीसच्या रूग्णांना किडन्या खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ग्लूकोज व बीपी लेव्हलसोबतच कोलेस्ट्रॉल लेव्हलचीही काळजी घेतली पाहिजे.
वजन कमी करा
किडन्यांचा आजार रोखण्यासाठी योग्य वजन ठेवा. यासाटी डाएटची काळजी घ्या आणि सोबतच फिजिकल अॅक्टिविटी करा. कमी तेलकट आणि शुगर असलेले फूड्सचं सेवन करा. त्याशिवाय एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊन एक्सरसाइज करा.