तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी वापरा या खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:25 AM2018-10-01T11:25:55+5:302018-10-01T11:26:43+5:30
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण चिंतेत, तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे अनेकांची दैनंदिन कामं प्रभावित होत आहेत.
(Image Credit : www.indianfolk.com)
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण चिंतेत, तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे अनेकांची दैनंदिन कामं प्रभावित होत आहेत. तसेच अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो आहे. अनेकदा चिंता आणि तणाव इतका वाढतो की, अनेकांच्या हृदयाचे ठोकेही वाढतात. ही परिस्थिती हाताळण्यासाठी काही प्रयोग केले जाऊ शकतात. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.
मोठा श्वास घ्या
जर तुम्ही काम करत असाल आणि तुमची तणाव वाढला असेल तर काही वेळ काम सोडून शांत बसा. मोठा श्वास ध्या. याने तुमचं ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके सामान्य होतील. जर तुम्ही सकाळी उठून प्राणायाम केला जर ही समस्या होण्याची शक्यता कमी असते.
हातांची मसाज करा
हातांची मसाज केल्याने तुमचा वाढलेला ताण कमी होतो. जर तुम्ही फार जास्त वेळ कम्प्युटरच्या कि-बोर्डवर टायपिंग करत असाल तर याने तुमचा ताण वाढू शकतो. अशावेळी थोडावेळ आपल्या हातांची मसाज करा, अंगठ्याची आणि त्याच्या आजूबाजूला मसाज केल्याने तणाव दूर होतो.
ग्रीन टी घ्या
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टी प्यायल्याने तुम्हाला फ्रेश वाटतं. ग्रीन टी ही कॅमिला सायनेंसिसच्या पानांपासून तयार केली जाते. नियमीतपणे २ ते ३ कप ग्रीन टी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात. ग्रीन टीमध्ये एल-थियेनाइन नावाचं केमिकल आढळतं जे रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतं.
रोज १५ मिनिटे करा मेडिटेशन
मेडिटेशन केल्याने तुमच्या मनाला आणि शरीराला शांतता मिळते. कमीत कमी १० मिनिटे मेडिटेशन केल्यासही फायदा होतो. याने तुमची एकाग्रचा वाढेल आणि तणाव दूर होईल.
आवडती गाणी ऐका
सतत काम करत राहिल्याने तणाव येणे सामान्य बाब आहे. पण हा तणाव किंवा चिंता दूर करण्यासाठी संगीत चांगला पर्याय आहे. कामातून थोडा वेळ काढून डोक्याला शांतता मिळवण्यासाठी तुमच्या आवडीची गाणी ऐका. याने तुमच्या मनाला शांतता मिळेल.