५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:48 PM2022-11-14T17:48:40+5:302022-11-14T17:50:06+5:30
वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. या प्रदुषणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. लहान मुलेही प्रदुषणामुळे प्रभावित होत आहेत. दिल्लीत किती प्रदुषण आहे हे आपण बघतच आहोत. प्रदुषणामुळे डेंग्यु, मलेरिया, डायरिया यांसारख्या आजारांनी मुले त्रस्त आहेत.
खराब पाणी, वाढते प्रदुषण याचा सर्वात जास्त धोका महिला, लहान मुलं, दिव्यांगांना होत आहे. युनिसेफच्या अहवालानुसार जलवायु प्रदुषणामुळे लहान मुलांमधील शारीरिक विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती यांना मोठा धोका पोहचतो.
५० कोटी मुलं तापमान वाढीमुळे प्रभावित
युनिसेफच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तापमान वाढीमुळे सध्या जवळपास ५० कोटी लहान मुलं प्रभावित आहेत आणि ही संख्या वाढत वाढत २ अब्ज होण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात ९३ टक्के मुलं, १५ वर्षापेक्षा कमी वयाचे मुलं वायु प्रदुषणात श्वास घेतात. हा त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि विकासासाठी मोठा धोका आहे. भारतासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे २०१९ जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार जगात ३० पैकी २१ प्रदुषित शहर भारतात आहेत.
क्लायमेट चेंज एंड हेल्थ च्या २०२१ च्या अहवालानुसार २०३० ते २०५० मध्ये दरवर्षी जगात २.५ लाख मृत्यु फक्त प्रदुषणातून झालेल्या आजारांमुळे होतील अशी शक्यता आहे.
प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं प्रदुषणामुळे त्वरित प्रभावित होतात. कारण मुलांची प्रभावित होण्याची क्षमता अधिक असते ते अधिक संवेदनशील असतात. लहान मुलांसाठी व्हिटॅमिन आणि मिनरल यांची आवश्यकता असते. मात्र प्रदुषणामुळे धान्न्यांमधील पोषक तत्वेच कमी होत आहेत. यामुळे शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोय.