जगातील 50 टक्के लोक तोंडाच्या 'या' समस्यांनी ग्रस्त, वेळीच काळजी घेतली नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:31 PM2022-11-22T12:31:39+5:302022-11-22T12:35:32+5:30

दातांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यातच तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. जगातील जवळपास ४५ टक्के लोकांना दातांच्या समस्यांनी ग्रासलेले आहे.

50-percent-world's-population-have-bad-oral-health-see-why-it-happens | जगातील 50 टक्के लोक तोंडाच्या 'या' समस्यांनी ग्रस्त, वेळीच काळजी घेतली नाहीतर...

जगातील 50 टक्के लोक तोंडाच्या 'या' समस्यांनी ग्रस्त, वेळीच काळजी घेतली नाहीतर...

googlenewsNext

दातांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यातच तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. जगातील जवळपास ४५ टक्के लोकांना दातांच्या समस्यांनी ग्रासलेले आहे. WHO जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. अहवालात नमुद केले आहे की , हिरड्यांतुन रक्त येणे, दात सडणे किंवा CANCER कॅन्सर या समस्या अनेक जणांना आहेत. दातांच्या समस्या का होतात यामगे काय कारणे आहेत जाणून घेऊया 

गेल्या ३० वर्षात दातांच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. ORAL CAVITY ओरल कॅव्हिटीच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या १ कोटी झाली आहे. १९५ देशांत यासंदर्भातील सर्वेक्षण केले गेले. यानुसार आज किमान ३ कोटी ५० लाख लोक तोंडाच्या, दातांच्या समस्येने त्रस्त आहेत. तर दरवर्षी जवळपास ३ लाख ८० हजार नवीन कॅन्सर पीडित रुग्ण समोर येतात.

हिरड्यांमध्ये दुखापत, रक्त येणे आणि दातांमध्ये दुखापत हे आजकाल फारच सामान्य आहे. ज्याप्रकारे आपण हृदयाचे विकार आणि डायबिटिस असल्यास काळजी घेतो तशाच प्रकारे दातांचीही काळजी घेतली पाहिजे. अनेक छोट्या शहरांमध्ये अजुनही दातांच्या आरोग्याबाबतीत जागरुकता नाही. 

BED ORAL HEALTH बेड ओरल हेल्थ कशामुळे होतो

ओरल हेल्थ च्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामागे चुकीच्या सवयी कारणीभुत आहेत. जास्त गोट खाणे, तंबाखूचे सेवन, दारु जास्त पिणे यामुळे तोंडाच्या दातांच्या समस्या सुरु होतात.  सुरुवातीला दात सडतो तर कधी कॅव्हिटीची समस्या येते मात्र नंतर याचे गंभीर परिणाम होतात. तंबाखूने कॅन्सर होतो हे माहित असतानाही लोक त्याचे व्यसन सुरुच ठेवतात.

Web Title: 50-percent-world's-population-have-bad-oral-health-see-why-it-happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.