जेवण केल्यावर महिलेच्या गालावर यायची सूज, रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी कपाळावर मारून घेतला हात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:37 PM2019-11-11T13:37:58+5:302019-11-11T13:45:59+5:30
डॉक्टरांसमोर कधी-कधी अशा केसेस येतात की, ते सुद्धा या केसेस बघून हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना इराकमधून समोर आली आहे.
डॉक्टरांसमोर कधी-कधी अशा केसेस येतात की, ते सुद्धा या केसेस बघून हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना इराकमधून समोर आली आहे. इथे एका ६६ वर्षीय महिलेची समस्या डॉक्टरांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. ही महिला जेव्हाही जेवण करते, तेव्हा तिचे गाल सूजतात. जेव्हा यासाठी तिची टेस्ट करण्यात तेव्हा समोर आलेला रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचे पॅरोटिड ग्लेंड म्हणजेच लाळ ग्रंथींमध्ये स्टोन होते. धक्कादायक बाब म्हणजे एक-दोन नाही तिच्या ग्रंथींमध्ये तब्बल ५३ स्टोन होते. या स्टोनमुळे तिने काहीही खाल्ल्यावर तिच्या गालांमध्ये सूज येत होती.
आता महिलेच्या लाळ ग्रंथींमधून स्टोन काढण्याची वेळ होती. पण इराकच्या डॉक्टरांसाठी हे सोपं काम नव्हतं. त्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या चेहऱ्यावर कोणतीही खून पाडल्याशिवाय स्टोन काढणे शक्य नाही. पण महिला यासाठी तयार नव्हती. यासाठी ती भारतात आली.
दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये महिलेची सर्जरी करण्यात आली आणि तिच्या लाळ ग्रंथींमधून सर्वच ५३ स्टोन काढण्यात आलेत. डॉक्टरांनुसार, ही जगातली पहिली अशी केस आहे. ज्यात एखाद्या महिलेच्या लाळ ग्रंथींमधून स्टोन आढळले आणि ते काढण्यात आलेत.
गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टर वरूण राय यांनी सांगितले की, हे फारच अवघड काम होतं. तिच्या चेहऱ्यावर कोणतंही निशान न पडू देता सहा सेमी लांब आणि ३-४ सेमी रूंद ग्रंथीतून स्टोन काढायचे होते. तब्बल दोन तासांच्या सर्जरीनंतर तिच्या लाळ ग्रंथींमधून ५३ स्टोन काढण्यात आले.
(Image Credit : AmarUjala)
लाळ ग्रंथी तोंडातील असा अवयव आहे, ज्यातून लाळ तयार होते. या ग्रंथी लाळ रिलीज करणे आणि पचनक्रियेत मदत करण्याचं काम करतात. यात पाण्याचं प्रमाण ९८ टक्के असतं. लाळ ग्रंथी २४ तासात जवळपास १ ते १.५ लिटर लाळ रिलीज करते. याने तोंडात ओलावा राहतो आणि तोंड स्वच्छ राहतं.