सततच्या तोंड येण्याला वैतागलात, या घरगुती उपायांनी मिळवा आराम !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 10:55 AM2018-04-11T10:55:16+5:302018-04-11T10:55:16+5:30
असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो.
तोंडाला फोडं येणं ही समस्या प्रत्येक तिस-या व्यक्तीला भेडसावते. पण उन्हाळ्यात ही समस्या अधिकच जास्त जाणवते. ही समस्या इतकी भेडसावते की, काही खाणं तर दूरच पाणी पिणंही कठिण होऊन बसतं. यावर उपाय करण्यासाठी बाजारातून अनेक महागड्या औषधींवर पैसे खर्च केले जातात. पण त्याने सगळ्यांनाच आराम मिळतो असे नाही. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो. त्यामुळे यावरील काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तोंड येणं ही एक साधारण बाब झाली आहे. अनेकदा तिखट खाल्ल्यानेही जिभेवर, तोंडात, ओठांवर फोड येतात आणि पाच ते सात यामुळे जगणं असह्य होतं. कधी कधी तर यातून रक्तही येतं. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
तोंड येण्याची मुख्य कारणे:
* जास्त मलासेदार पदार्थ खाणे.
* जास्त गरम पदार्थ किंवा ड्रिंकचे सेवन करणे.
* दातांची निट स्वच्छता न करणे.
* जास्त अॅसिडिक पदार्थांचं सेवन करणे.
* शरिरात व्हिटॅमिन बी आणि आयर्नचे संतुलन ठिक नसणे.
* अॅलर्जी असलेल्या पदार्थांचं सेवन करणे.
कधी कधी थोडा ताप आल्यावरही तोंड येतं. महिलांना मासिक पाळी दरम्यानही तोंडाला फोड येतात. तणाव असल्यानेही तोंडात फोड येतात. तोंड आल्यानंतर तुम्हाला दातांच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं.
* तोंड आल्यावर काय घरगुती उपाय कराल?
१) एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ घाला आणि हे पाणी तोंडात थोडा वेळ ठेवा. हे दिवसातून दोन तिनदा करा. याने थोडी जळजळ आणि त्रास होईल, पण तोंडाचे फोड लवकर बरे होतील.
२) तोंडात फोड आल्यावर तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या.
३) खायच्या पानचं चूर्ण तयार करा. त्यात थोडं सहद मिसळून त्याचा चाट्न तयार करा. त्याने फोड लवकर बरे होतील.
४) खायच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप घालून ते फोडांवर लावा, त्याने लवकर आराम मिळेल.
५) लिंबूच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.
६) जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या, याने पोट साफ होईल आणि तोंडाला आराम मिळेल.