सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमचा 'हा' आहे फिटनेस फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 11:26 AM2018-11-25T11:26:42+5:302018-11-25T11:29:28+5:30
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे.
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेरीने युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. याचबरोबर मेरी कोम 6 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली महिला बॉक्सर ठरली आहे.
मेरीने तब्बल 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले होते. आपलं सहावं सुवर्णपदक जिंकत तिने आयर्लंडच्या केटी टेलरला मागे टाकले आहे. त्याचबरोबर मेरीने पुरूष बॉक्सर फेलिक्स सेवनच्या 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यामध्ये अजिबात काही शंका नाही की, एवढी आव्हानं पेलवण्यामध्ये तिच्या फिटनेसचा सर्वात मोठा रोल आहे. जाणून घेऊयात तीन मुलांची आई असलेल्या 35 वर्षीय सुपर मॉम मेरी कोमचा फिटनेस फंडा...
मेरी कोमचं वर्कआउट
दिवसभरात कितीही काम असो पण त्यातूनही आपल्या एक्सरसाइज आणि वर्कआउटसाठी मेरी नेहमीच आपला वेळा राखून ठेवते. तिच्या वर्कआउटमध्ये रनिंग, स्ट्रेचिंग, स्किपिंग, होप्पिंग, पंचिंग, किकिंगचा समावेश असतो. healthnutrition.co.in च्या एका रिपोर्टनुसार, ती रोज अर्धा तास बॅगेवर पंचिंग आणि किकिंगची प्रॅक्टिस करते. मेरी कोम दररोज कमीतकमी 14 किलोमीटर रनिंग करते. याशिवाय ती काही फ्लोर एक्सरसाइजदेखील करते.
मेरी कोमचा डाएट प्लॅन
ती दररोज बॅलेन्स आणि न्यूट्रिशनल डाएट घेते. वर्कआउटच्या आधी ती लाइट स्नॅक्स खाणं पसंत करते. त्यानंतर ती हेव्ही ब्रेकफास्ट करते. याव्यतिरिक्त ती तिखट पदार्थांपासून लांब राहते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती आपलं डाएट स्ट्रिक्टली फॉलो करते. ती ब्रेकफास्ट आणि लंच 1 ते 2 वाजेपर्यंत आणि डिनर 8 ते 9 वाजेपर्यंत घेते. मेरी कोम स्वतःला हायड्रेट आणि अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी दिवसभरात ज्यूसचं सेवन करते. याव्यतिरिक्त झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध घेणं असा तिचा दिनक्रम ठरलेला असतो.
ध्यान केंद्रित करण्यासाठी करते एक्सरसाइज
आपली एकाग्रता वाढवणं आणि मानसिक संतुलन राखणं कोणत्याही खेळाडूसाठी आवश्यक असतं. त्यासाठी मेरी कोम ब्रेन-आय कोआर्डिनेशन एक्सरसाइज करते. याव्यतिरिक्त ती कधीच न्यूट्रिशनल सप्लीमेंट घेत नाही.
दररोज 8 तास प्रॅक्टिस
जर तुम्ही हिंदी चित्रपट 'मेरी कोम' पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की, चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी मेरीने घेतलेली मेहनत आणि तिचा इथपर्यंतचा प्रवास किती खडतर होता. मेरी दररोज आठ तास प्रॅक्टिस करते. त्यामध्ये चार तास सकाळी आणि चार तास संध्याकाळी ती प्रॅक्टिस करते.