कापरचे हे ७ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 10:34 AM2018-08-09T10:34:53+5:302018-08-09T14:31:34+5:30

पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापूरचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो हे अनेकांना माहीत नसतं.

7 health benefits of camphor | कापरचे हे ७ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

कापरचे हे ७ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

(Image Credit : www.natureloc.com)

पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापराचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो हे अनेकांना माहीत नसतं. कापराच्या मदतीने अनेक प्रकारचे आजार बरे केले जाऊ शकतात. याचा वापर औषध म्हणून केला जातो आणि याचं तेलही खूप फायदेशीर मानलं जातं. अनेक औषधांमध्येही कापूर घातलेलं असतं. चला जाणून घेऊ कापराचे ७ आरोग्यदायी फायदे...

१) जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा. कापरात अॅंटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं. 

२) शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने वेदना दूर होतील. सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापराचा उपयोग केला जाऊ शकतो. 

३) डॅंड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी कापराचा वापर करता येतो. खोबऱ्याच्या तेलात कापूर मिश्रित करुन याने केसांची मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. हा उपाय लागोपाठ काही दिवस केल्यास फायदा दिसेल. 

४) खोबऱ्याच्या तेलात कापूर टाकून चांगलं मिश्रण तयार करा आणि याचा वापर खास झालेल्या जागेवर करा. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

५) जर तुम्हाला कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर ती जागा कापराने स्वच्छ केल्यास फायदा होऊ शकतो. कापराच्या धुराने इन्फेक्शन दूर होऊ शकतं.  

६) तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा. 

७) दातांमध्ये वेदना होत असतील तर त्या जागेवर कापूर पावडर लावा. याने दातांचं दुखणं लगेच दूर होईल. 

Web Title: 7 health benefits of camphor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.