हिवाळ्यात जास्त दिसतात Heart Attack ची ही 7 लक्षणं, वैज्ञानिकांनी दिला योग्य नाश्त्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:25 AM2023-11-18T11:25:32+5:302023-11-18T11:26:04+5:30
Heart Attack Symptoms : थंडीच्या दिवसात हृदयावर जास्त दबाव पडतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीरात सगळीकडे ब्लड सर्कुलेशन कमी होतं.
Heart Attack Symptoms : तापमान अचानक कमी झाल्याचा प्रभाव हृदयावर बघायला मिळतो. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, थंडीच्या दिवसात तुमचं हृदय आणि ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. ज्यामुळे तुम्हाला Heart Attack, स्ट्रोक (Stroke) आणि हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) चा धोका अधिक वाढतो.
हार्ट अटॅक हिवाळ्यात जास्त का येतात?
थंडीच्या दिवसात हृदयावर जास्त दबाव पडतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीरात सगळीकडे ब्लड सर्कुलेशन कमी होतं. अशात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. हेच कारण आहे की, थंडीच्या दिवसात समस्या वाढते आणि मृत्युचा धोका वाढतो.
हिवाळ्यात हार्ट अटॅकची लक्षणं
- छातीमध्ये दबाव, वेदना सतत होणं हे हार्ट अटॅकचं लक्षणं असू शकतो.
- सतत शरीरात वेदना किंवा अस्वस्थता, हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात वेदना होणे
- श्वास घेण्यास समस्या, छातीत दबाव
- जास्त घाम येणे, ज्याला सामान्यपणे 'cold sweat' म्हटलं जातं
- कधी कधी विनाकारण मळमळ किंवा उलटी जाणवणे
- अचानक खूप जास्त थकवा किंवा कमजोरी येणे
- चक्कर येणे किंवा डोकं फिरणे, बेशुद्ध पडणे
हेल्दी ब्रेकफास्टने टाळता येईल धोका
नाश्ता नेहमीच दिवसातील महत्वाचा भाग असतो. आता वैज्ञानिकांना आढळलं की, नाश्ता हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो. पण हे यावर अवलंबून आहे की, तुम्ही नाश्त्यात काय खाता. BMC Medicine मध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.
प्लांट बेस्ड फूड फायदेशीर
वैज्ञानिकांचं मत आहे की, नाश्त्यात मांस आणि डेअरी पदार्थांऐवजी कडधान्य, बीन्स, नट्स, ऑलिव्ह ऑइल, फळं आणि भाज्या यांसारख्या प्लांट बेस्ड पदार्थांचं सेवन करून हृदयरोग आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो.
डायबिटीसचा धोका होईल कमी
वैज्ञानिकांना आपल्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, नाश्त्यात प्लांट बेस्ड डाएट घेतल्याने हृदयरोगासोबतच टाइप 2 डायबिटीसचा धोकाही कमी होतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अशा लोकांना कोणत्याही कारणाने मृत्युचा धोकाही कमी होतो.