लगेच बंद करा 'या' ७ वस्तूंचा वापर, आरोग्य बिघडलं तर कुणावर फोडू शकणार नाही खापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 10:37 AM2019-04-03T10:37:39+5:302019-04-03T10:37:45+5:30
दैनंदिन जीवनात आपण रोज अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. यातील अनेक वस्तू आपण सुविधेसाठी तर काही लाइफस्टाइल मेंटेनसाठी आणि काही स्वच्छतेसाठी वापरतो.
दैनंदिन जीवनात आपण रोज अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. यातील अनेक वस्तू आपण सुविधेसाठी तर काही लाइफस्टाइल मेंटेनसाठी आणि काही स्वच्छतेसाठी वापरतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तुम्ही ज्या प्रॉडक्ट्सचा वापर करता त्यांचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशाच ७ प्रॉडक्टबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रेस्ड वुड प्रॉडक्ट्स
प्रेस्ड वुडचा वापर टेबलपासून ते अनेकप्रकारच्या लाकडाच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. प्रेस्ड वुडने येणारी फिनिशिंग लोकांना आवडते. पण याने तुमच्या आरोग्याला हानी होऊ शकते. प्रेस्ड वुड हे लाकड्यांच्या भुशाला प्रेस करून तयार करण्यात येतं. यावेळी ज्या गोंदाचा वापर केला जातो त्यात रेसिन नावाचं केमिकल असतं. यात यूरिया-फार्मेल्डिहाइड असतं हे रूममध्ये हवेसोबत मिश्रित होतं. उन्हाळ्यात ही प्रक्रिया आणखी वाढते. श्वासासोबत शरीरात गेल्यावर या केमिकलमुळे फुप्फुसाला त्रास होऊ शकतो.
अॅंटी-बॅक्टेरिअल साबण
अनेकजण अॅंटी-बॅक्टेरिअल साबणालाचा वापर करतात. पण हे खरंच हेल्दी आणि फायदेशीर असतात का जितके सांगितले जातात? एका रिपोर्टनुसार, याप्रकारच्या हॅन्डवॉशच्या तुलनेत सामान्य साबण जास्त चांगले असतात. अॅंटी-बॅक्टेरिअल साबणात ट्रायक्लोसन नावाचं केमिकल असतं. जे बॅक्टेरियाला नष्ट करणारं आणि अॅंटी-फंगल एलिमेंट असतं. पण याचा जास्त वापर केल्याने आरोग्याचं नुकसान होतं.
डासांना पळवणारी कॉइल
मस्कीटो कॉइल डास दूर जात असतील पण याने आरोग्याचं नुकसान होतं त्याचं काय? एका रिसर्चनुसार, एका कॉइलमधून जितका धूर निघतो तो ७५ ते १३७ सिगारेटींच्या बरोबरीत असतो. आता हे तुम्हीही समजू शकता की, हे किती धोकादायक आहे.
स्टायरोफोम
अनेकदा घरात पार्टी किंवा लग्न असेल तेव्हा स्टायरोफोमचे ग्लास किंवा प्लेट वापरल्या जातात. स्टायरोफोममध्ये स्टाइरिन नावाचं केमिकल असतं, ज्याने कॅन्सर होण्याचा होण्याचा धोका असतो. अशात या प्रॉडक्टचा वापर करणे बंद करायला हवे.
कॉस्मेटिक
कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये किती केमिकल असतात हे काही कुणापासून लपलेलं नाही. तसेच या प्रॉडक्ट्सचा वापर पूर्णपणे बंद करा असंही म्हणता येणार नाही कारण तसं होणारही नाही. पण याचा वापर कमी नक्कीच केला जाऊ शकतो. कारण अनेक कंपन्या हा दावा करताता की, त्यांच्या प्रॉडक्टमध्य केमिकल नाहीत. पण हे खरं नाही. यांचा फार जास्त वापर केल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. कॉस्मेटिकचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा.
अगरबत्ती आणि धूपबत्ती
पूजेदरम्यान वापरली जाणारी अगरबत्ती आणि धूपबत्तीमुळे घरात किंवा कुठेही सुगंध भलेही चांगला येत असेल. पण याने तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात. एका रिसर्चनुसार, यांमुळे श्वासाची समस्या ते कॅन्सरचा धोका असतो. याचं यात वापरलेले वेगवेगळे केमिकल्स असतात.
एअर फ्रेशनर
(Image Credit : HowStuffWorks)
आजकाल टीव्हीवर अनेक एअर फ्रेशनरच्या जाहिराती येत असतात. याचीही विक्रीही भारतात फार वाढली आहे. मात्र एअर फ्रेशनरच्या जास्त वापरामुळे तारपीन आमि एथिलीन ग्लायकोलची समस्या होते. हे तत्त्व श्वासाद्वारे शरीरात जातात आणि याने वेगवेगळ्या समस्या होतात.