थंडीच्या दिवसात हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर दिसतात हे 7 संकेत, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:28 PM2023-12-13T14:28:57+5:302023-12-13T14:29:23+5:30
Heart Blockage Symptoms : थंडीच्या दिवसात हार्ट ब्लॉकेज होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो, ज्याला कोरोनरी आर्टरी डिजीज (सीएडी) म्हटलं जातं.
Heart Blockage Symptoms : हिवाळ्यात हृदयाचं आरोग्य जपणं फार महत्वाचं असतं. कारण हिवाळ्यात हृदयासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. खासकरून हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी खास सावध राहण्याची गरज आहे. थंडीच्या दिवसात हार्ट ब्लॉकेज होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो, ज्याला कोरोनरी आर्टरी डिजीज (सीएडी) म्हटलं जातं.
हार्ट ब्लॉकेजची कारणं?
हृदयामध्ये अडथळा तेव्हा होतो जेव्हा हृदयाच्या मांसपेशी रक्त पुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमण्या संकुचित आणि अरूंद होतात. असं वेगवेगळ्या कारणांनी होतं. उदाहरण सांगायचं तर कोलेस्ट्रॉल वाढणं, थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचाही धोका वाढतो. थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशर वाढू शकतं. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो.
हार्ट ब्लॉकेजची लक्षणं
- छातीत वेदना किंवा अस्वस्थता
- नेहमीच छातीत दाटल्यासारखं वाटणे किंवा दबाव जाणवणे
- श्वास घेण्यास समस्या होणे
- थोडं काम करूनही थकवा किंवा कमजोरी वाटणे
- बेशुद्ध पडणे, चक्कर येणे
- हृदयाची धडधड अनियमित होणे
- काही लोकांना मळमळ, घाम किंवा चिकटपणा वाटणे
ब्लॉक नसा मोकळ्या करण्याचा उपाय
शरीर गरम ठेवा
शरीर गरम ठेवण्यासाठी एकावर एक किंवा उष्ण कपडे घाला. खासकरून हिवाळ्यात. असं करून थंडी आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यापासून रोखता येतात.
रोज एक्सरसाइज करा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे शारीरिक हालचाल करत रहा. जर हिवाळ्यादरम्यान बाहेरील एक्सरसाइज अवघड असेल तर इनडोअर एक्सरसाइज करा.
हेल्दी डाएट घ्या
कमी सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेल्या फूड्सचं सेवन करा. यासाठी आपल्या डाएटमध्ये फळं, हिरव्या भाज्या, कडधान्य आणि लीं प्रोटीनचा समावेश करा.
तणाव कमी घ्या आणि हायड्रेटेड रहा
विपश्यना, योगा आणि मोठा श्वास घेण्याचे व्यायामसारख्या तणाव कमी करणाऱ्या अॅक्टिविटी करा. भरपूर पाणी प्या, कारण डिहायड्रेशन हृदयावर दबाव टाकू शकतो.
दारू पिणं आणि धूम्रपान सोडा
दारूचं सेवन कमी करा आणि धूम्रपान सोडा. कारण या सवयींमुळे हृदयरोग आणखी जास्त वाढतो. हार्ट ब्लॉक आणि हृदयासंबंधी समस्या कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली आणि डाएटची काळजी घ्या.