70 टक्के व्यसनी लोक मानसिक आजाराचे शिकार; जागतिक मानसिक आराेग्य दिन विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:03 AM2022-10-10T06:03:12+5:302022-10-10T06:03:27+5:30

मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन म्हणून पाळला जाताे.

70 percent of addicts suffer from mental illness; World Mental Health Day Special | 70 टक्के व्यसनी लोक मानसिक आजाराचे शिकार; जागतिक मानसिक आराेग्य दिन विशेष

70 टक्के व्यसनी लोक मानसिक आजाराचे शिकार; जागतिक मानसिक आराेग्य दिन विशेष

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीसवर्षीय समीर सुरुवातीला थाेडी दारू प्यायचा. मात्र, ते व्यसन सहा महिन्यांत वाढले. त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार यायचा. घरच्यांनी त्याला रुग्णालयातील मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवले. डाॅक्टरांनी त्याचे वैद्यकीयदृष्ट्या मूल्यांकन केले असता दारू पिण्याचे कारण हाेते. त्याला आलेले नैराश्य. डाॅक्टरांनी त्याच्या व्यसनाधीनतेसह या मानसिक आजारांवरही उपचार केल्याने ताे व्यसनाधीनतेतून बाहेर पडला आहे.

मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन म्हणून पाळला जाताे. मानसिक आजारांची कारणे वेगवेगळी असतात; परंतु व्यसनी लाेकांना मानसिक आजार असल्याचे आढळून येत आहे. दारूच्या आहारी गेलेल्या बहुतांश म्हणजेच ६० ते ७० टक्के जणांना काही ना काही मानसिक आजार आढळून येत असल्याचे मानसाेपचार तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केवळ त्याच्या व्यसनाधीनतेवर नव्हे, तर त्याच्या या मानसिक आजारावरही उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे नातेवाइकांनी केवळ दारूसाठी नव्हे तर त्याचे मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी मानसाेपचारतज्ज्ञांना दाखवणे गरजेचे असते.

बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसाॅर्डरमध्ये त्यांच्या स्वभावातच दाेष असताे. त्यातून ताे वारंवार त्या व्यसनाकडे ओढला जाताे, तसेच इंपल्सिव्ह म्हणजे त्यांच्यामध्ये तारतम्य नसते. एकाचवेळी खूप दारू पिणे, पत्ते खेळणे असे दिसून येते. हायपर सेन्सिटिव्ह ज्यामध्ये ताे रागात त्याच्या किंवा स्वत:च्या जिवाला बरेवाईट करताे. यामध्ये स्वत:च्या हातावर वार करणे असे प्रकार दिसून येतात. 

मोबाइलवेड्या शाळकरी मुलांचा होणार सर्व्हे
सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल अपरिहार्य बनला; पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाइलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.
 माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाइलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे.     विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. मोबाइलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत  समुपदेशन केले जाईल.

राेज ४० ते ५० रुग्ण येतात. त्यापैकी व्यसनी असलेल्यांची संख्या जास्त असते. व्यसनींमध्ये बहुतांश जणांना नैराश्य असल्याचे दिसून येते. व्यसनी व्यक्तीना मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवून त्याला इतर काही मानसिक आजार आहे का, हे  पाहून उपचार करावेत.
- डाॅ. मनजित संत्रे, 
विभागप्रमुख, मानसाेपचार विभाग, वायसीएम रुग्णालय

—-

Web Title: 70 percent of addicts suffer from mental illness; World Mental Health Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.