प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे ७० टक्के संरक्षण

By admin | Published: July 31, 2015 11:03 PM2015-07-31T23:03:07+5:302015-07-31T23:03:07+5:30

-एनफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

70 percent protection due to preventive vaccination | प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे ७० टक्के संरक्षण

प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे ७० टक्के संरक्षण

Next
-ए
नफ्लून्झावर राष्ट्रीय परिषद : विदर्भ असो. ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस

नागपूर : एनफ्लूएन्झावर प्रतिबंधात्मक म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणामुळे साधारण ७० टक्के संरक्षण मिळू शकते, व एनफ्लूएन्झा टाळणे शक्य होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रा. ए.के. प्रसाद यांनी केले.
विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टस (व्हीएएमएम) आणि एनफ्लूएन्झा फाऊंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने एनफ्लूएन्झावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी व्हीएएमएमचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, डॉ. अजय लांजेवार, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. प्रतिभा नारंग, डॉ. प्रदीप मिश्रा, डॉ लीना बिरे काळमेघ, डॉ. यज्ञेश ठाकर व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले.
लसीकरण केल्यानंतर देखील जर एनफ्लूएन्झा झाल्यास त्याचा संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा असतो. मृत्यू ओढवत नाही, असे मत डॉ. प्रसाद यांनी मांडले. यावेळी उपस्थित तज्ज्ञानी एनफ्लूएन्झावर माहिती देत त्यावरील उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. हरीश वरभे यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र सरनाईक यांनी तर आयएमएच्या सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी आभार मानले.

Web Title: 70 percent protection due to preventive vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.