फक्त ७००० पावलं चाला, 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची मुक्तता, संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 07:12 PM2021-09-13T19:12:13+5:302021-09-13T19:34:33+5:30
दररोज किमान ७००० पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे.
दिवसभरात कामामुळे व्यस्त असणाऱ्या लोकांना अनेकदा सकाळी व्यायामासाठी उठणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना फिटनेस (Fitness) राखणे जमत नाही. परंतु तरीही ते सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी वेळ काढून व्यायाम करताना दिसतात. हे करणे तुम्हालाही शक्य नसेल, परंतु आपण आपली कामं करत असताना दररोज किमान ७००० पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे.
एका रिपोर्टनुसार जी लोक दररोज ७००० पावलांची पायपीट करतात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत काही गंभीर आजारांचा धोका कमी असतो. मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटी (University of Massachusetts) च्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या संशोधनात ११ वर्षात २००० लोकांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे रिस्क कमी होत आहे, असा दावा करण्याता आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) सल्ला काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक सल्ल्यानुसार वृद्धांना आठवड्याभरात किमान १५० मिनिटं वॉकिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आता वृद्धांसह तरूणांना या संशोधनातून समोर आलेल्या माहितीचा फायदा होणार आहे.