78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:18 PM2024-07-30T18:18:49+5:302024-07-30T18:20:26+5:30

क्लीव्हलँड क्लिनिकचे चीफवेलनेस अधिकारी डॉक्टर मायकल रॉइजन (Dr. Michael Roizen) यांचे वय 78 वर्षं एवढे आहे. मात्र, आपण आपले बायोलॉजिकल वय 20 वर्षांहूनही अधिक कमी केले आहे. आता आपले बायोलॉजिकल वय 57.6 वर्षं एवढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

78-year-old doctor reduced 20 years age says 3 formulas to stay young for a long time | 78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले

78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले

आपण वजन घटवल्याची अनेक उदाहरणं ऐकली असतील. पण, वय घटवण्यासंदर्भात कधी ऐकलंय का? कधी विचा तरी केलाय का? आपण दीर्घायुष्य जगावे आणि ते आयुष्य निरोगी, ठणठणीत असावे, असे सर्वांनाच वाटत असते. सध्या, रिव्हर्स एजिंग आणि बायो हॅकिंग सारख्या अनेक टर्मची मोठी चर्चा होताना दिसत आहे. अनेक वैज्ञानिक आणि डॉक्टर असे काही मार्ग सुचवत आहेत, ज्यांद्वारे आपण आपली प्रणाली तरुण आणि ठणठणीत ठेवू शकतो.

क्लीव्हलँड क्लिनिकचे चीफवेलनेस अधिकारी डॉक्टर मायकल रॉइजन (Dr. Michael Roizen) यांचे वय 78 वर्षं एवढे आहे. मात्र, आपण आपले बायोलॉजिकल वय 20 वर्षांहूनही अधिक कमी केले आहे. आता आपले बायोलॉजिकल वय 57.6 वर्षं एवढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी 3 पद्धतीही सांगितल्या आहेत. ज्यांचा अवलंब आपणही करू शकता.

कार्डिओ एक्सरसाइज -
डॉक्टर रॉइजन यांनी बिझनेस इनसाइडरसोबत बोलताना दीर्घायुष्य आणि आपल्या हेल्थ-फिटनेसचा फॉर्म्युला सांगितला आहे. यांपैकी पहिला आहे कार्डिओ एक्सरसाइज. डॉक्टर रॉइजन आठवड्यातून 3 वेळा 48 मिनिटांपर्यंत कार्डिओवस्कुलर एक्सरसाइज नक्की करतात. यासाटी ते ट्रेडमिल अथवा एक्सरसाइज बाइकचा वापर करतात. आपल्याकडे, ट्रेडमिल नसेल तर, आपण ब्रिस्क वॉक (1 मिनिटांत 132 पावले), धावणे, स्वीमिंग, सायकलिंग अथवा दोरीवरच्या उड्या, यांपैकी काहीही करू शकता.

रेजिस्टेंस ट्रेनिंग -
डॉक्टर मायकल आठवड्यातून दोन वेळा वेट लिफ्टिंग करतात. दीर्घायुष्यासाठी मसल्स तयार होणे आवश्यक आहे. यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग करणे आश्यक आहे. 2022 मध्ये पब्लिश ब्रिटिश जर्नल स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमधून अशी गोष्ट समोर आली होती की, आठवड्यातील 30 ते 60 मिनिटांची रझिस्टन्स ट्रेनिंग अनेक घातक आजारांपासून आपला बचाव करू शकते. यात कॅन्सर आणि हार्ट अॅटॅक सारख्या आजारांचाही समावेश आहे.

चालणे -
कार्डियो आणि वेट लिफ्टिंग बरोबरच, डॉक्टर रॉइजन रोज 10 हजार पावले चालतात. यासाठी ते अनेक गोष्टींचा अवलंब करतात. जसे की, कामाच्या ठिकाणी ट्रेडमिल डेस्क ठेवणे, गाडी ऑफिसपासून दूर पार्क करणे आदी. यामुळे व्यस्त असले तरीही त्यांचा स्टेप काउंट पूर्ण होतो. 2022 च्या आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, आपण आठवड्यातून 5 दिवस ब्रिक्स वॉक केल्यास मेंदू निरोगी राहतो, टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि आपले आयुर्मानही वाढते.

Web Title: 78-year-old doctor reduced 20 years age says 3 formulas to stay young for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.