तुमच्या या वाईट सवयी असतात तुमच्यासाठी फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 01:20 PM2018-05-21T13:20:48+5:302018-05-21T13:20:48+5:30
तुम्हाला कदाचित माहीत नसेल तुमच्या काही वाईट सवयीही तुमच्यासाठी चांगल्या असतात. चला जाणून घेऊया काही वाईट सवयी ज्या तुमच्यासाठी चांगल्या ठरु शकतात.
प्रत्येकालाच काहीना काही वाईट सवयी असतात. जगातला कोणताही माणून परफेक्ट असू शकत नाही. कुणात काही कमतरता असते तर काहींमध्ये काहीना काही चांगल्या गोष्टी असतात. तुमच्या वाईट सवयींबद्दल तुम्हाला अनेकांची बोलणीही खावी लागत असेल. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल तुमच्या काही वाईट सवयीही तुमच्यासाठी चांगल्या असतात. चला जाणून घेऊया काही वाईट सवयी ज्या तुमच्यासाठी चांगल्या ठरु शकतात.
गप्पांमध्ये रमणं -
तसे तर तुमची बडबड करण्याची सवय अनेकांसाठी त्रासदायक असू शकते. पण ती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. गप्पा करतांना किंवा एकमेकांचं ऐकताना आपली ऐकण्याची क्षमता वाढते.
टीव्ही बघण्यात व्यस्त -
टीव्ही बघणे हे नुकसानदायक नाहीतर फायद्याचं असतं. टीव्ही बघणे तुम्हाला अपडेट ठेवण्यासोबतच तुमच्या मेंदुचा व्यायाम होतो. त्यासोबत तुमचं मनोरंजन करुन तुम्हाला तणावापासून दूर ठेवतो.
कॉफी पिणे -
प्रमाणापेक्षा जास्त कॉफीचं सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक मानलं जातं. पण कॉफी प्यायल्याने डाएबिटीजचा धोक कमी होतो. त्यासोबतच कॉफी तुम्हाला तणावापासून दूर ठेवण्यास मदत करते.
वाईन पिणे -
वाईनला दारुच्या श्रेणीत आणून याला एक चुकीची सवय मानली जाते. पण रेड वाईन ही तुमच्या हृदयासाठी चांगली मानली जाते.
घाई-गडबड -
एखाद्या गोष्टीची व्याकूळता किंवा घाई गडबड करणे वाईट सवयींमध्ये मोडले जातात. पण व्याकूळ असणे किंवा घाई गडबड करणे तुम्हाला स्फुर्ती देतं.
चिडचिड करणे -
काही लोकांना फारच लवकर राग येतो. त्यावरुन त्यांना खूपकाही ऐकावं लागतं. पण राग येणं तुमच्यासाठी चांगलंही असतं. राग आल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि मनाचा भारही कमी होतो.
चॉकलेट खाणे -
काही लोक चॉकलेटला जंक फूडचा प्रकार मानतात. त्यामुळे ते रोज चॉकलेट खात नाहीत. पण एका अभ्यासानुसार रोज चॉकसेट खाणे तुमच्या हृदयासाठी चांगलं असतं. खासकरुन डार्क चॉकलेट.