हातात धरून पुस्तक- पेपर वाचल्यानं होतात 8 फायदे. वाचनानं अल्झायमरसारखे आजार राहतात दहा हात दूर.
By Admin | Published: June 8, 2017 06:21 PM2017-06-08T18:21:08+5:302017-06-08T18:21:59+5:30
संशोधन सांगतंय तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा.
-माधुरी पेठकर
काही वर्षांपूर्वी जर कोणाला ‘तुमची आवड काय आहे?’ ‘तुम्हाला काय आवडतं? असं विचारलं की बहुतेकजण ‘मला वाचनाची आवड आहे’ म्हणून सांगायचे. पण आता हाच प्रश्न विचारला तर उत्तरं अनेक येतात. पण त्यात वाचनाची आवड असलेले खूप कमीजण आढळतात. स्मार्ट फोन, कम्प्युटर, गुगल, यू ट्यूब यामुळे वाचन संस्कृती थोडी मागे पडली आहे.
पूर्वी ‘वाचाल तर वाचाल’ या नियमाप्रमाणे घरातले मोठे मुलांना वाचायलाच सांगायचे. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना भरपूर वाचायला मिळावं यासाठी वाचनालय लावून द्यायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाचा वाचा म्हणून सांगणारे मोठे स्वत:ही दिवसभरात हातात पुस्तक, मासिक नाहीच काही तर पेपर तरी पूर्ण वाचायचे.
पण हल्ली वाचनाची आवड कमी झालीये. काहींच्या बाबतीत त्यांना वाचनाची आवड आहे पण सवड मिळेनाशी झाली आहे. तर कोणाला हातात पुस्तक आणि पेपर धरून वाचायला आवडत नाही. अनेकजण धावतपळत संगणकावर गुगलवरून जेवढं वाचतात तेवढंच वाचण्यात आनंद मानत आहे.
हे असं जरी असलं तरी संशोधन मात्र वाचत राहा या सल्ल्यावर ठाम आहे. वाचनाच्या संदर्भात गेल्या काही दिवसात जगभरात जे संशोधन झालं ते हेच सांगतं की तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा. आणि वाचन म्हणजे एका जागी निवांत बसून हातात पुस्तक धरून वाचणं संशोधनाला अभिप्रेत आहे.
वाचनाच्या सवयीवर विविधअंगांनी जे संशोधन झालं आहे ते वाचनाचे शरीर आणि मनावर कसे चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात हेचं सांगतं. जगण्याच्या दिशेपासून जगण्याच्या समाधानापर्यंत सर्व काही वाचनातून मिळू शकतं असा अभ्यास सांगतो.
7. वाचनामुळे शांत झोप येते.
झोपायला जाण्याआधीची चांगली सवय म्हणूनही वाचनाकडे बघता येतं. वाचनामुळे मन आणि बुध्दी शांत होते. हातात धरून पुस्तक वाचनामुळे मनाला खरी शांतता मिळते. मोबाइल किंवा संगणाकाच्या स्कीनवर वाचन करून डोळ्यांवर आणि बुध्दीवर ताणच येतो. हातात धरून वाचलेलं पुस्तकच मनाला हवी असलेली शांतता देवू शकतं. म्हणून झोपायला जाण्याआधी किमान वीस मीनिटं तरी हातात पुस्तक, पेपर धरून काहीतरी वाचायला हवं.
8. वाचनानं वाचन वाढतं.
आज हातात पुस्तक, पेपर धरून वाचन कमी झालेलं असलं तरी बहुतांश पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांनी पुस्तकं वाचावीत. असं वाटत असेल तर मुलांना रोज मोठ्यानं गोष्टी वाचायला सांगा. जसजशी मुलं वाढतील त्यांच्यातील वाचनाची सवय नुसती कायम राहात नाही तर ती वाढते. याउलट बहुतांश घरात मुलं मोठ्यानं वाचत असतील तर त्यांना टोकलं जातं आणि त्यांना मनातल्या मनात वाचण्याचा आग्रह केला जातो. पण त्यामुळे कदाचित त्यांची लहानपणाची वाचनाची सवय पुढे कॅरी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मुलांना जर मोठयानं वाचण्याची सवय असेल तर त्यांना तसं वाचू द्या.