94 टक्के कर्मचारी म्हणतात, ऑफिसमध्ये थोडा वेळ हवी झोप! कार्यक्षमतेत वाढीसह आरोग्यही चांगले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 06:43 AM2023-12-17T06:43:31+5:302023-12-17T06:43:45+5:30

जपानमध्ये अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या ‘इनेमुरी’ संकल्पनेत ऑफिसमध्ये थोडा वेळ का होईना झोप घेतली जाते.

94 percent of employees say, they need some time to sleep in the office! Better health along with increased performance | 94 टक्के कर्मचारी म्हणतात, ऑफिसमध्ये थोडा वेळ हवी झोप! कार्यक्षमतेत वाढीसह आरोग्यही चांगले 

94 टक्के कर्मचारी म्हणतात, ऑफिसमध्ये थोडा वेळ हवी झोप! कार्यक्षमतेत वाढीसह आरोग्यही चांगले 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कार्यालयात काम करताना थोडा वेळ झोप (पॉवर नॅप) घेतल्यास थकवा कमी होतो, तसेच कार्यक्षमतेत वाढ होण्यासह आरोग्यही चांगले राहत असल्याचे मत विविध क्षेत्रातील सुमारे ९४ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

जपानमध्ये अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या ‘इनेमुरी’ संकल्पनेत ऑफिसमध्ये थोडा वेळ का होईना झोप घेतली जाते. त्यानुसार, मनुष्यबळ विकास क्षेत्रातील जीनियस कन्सल्टंटने केलेल्या नुकतेच सर्वेक्षण केले. त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी अल्पविश्रांतीबाबत सहमती दर्शविली. दिवसभरातील कामाच्या ताणतणावात, धावपळीत अल्प विश्रांती घेतल्यास कार्यक्षमता वाढून अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, तसेच आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल, असे ९४% कर्मचाऱ्यांनी म्हटले. 

२५ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या सर्वेक्षणात बँकिंग-फायनान्स, इंजिनिअरिंग, शिक्षण, एफएमसीजी, आदरातिथ्य, मनुष्यबळ विकास, आयटी, बीपीओ, लॉजिस्टिक, प्रसारमाध्यमांसह विविध क्षेत्रांतील १,२०७ कर्मचारी सहभागी झाले होते.

‘पॉवर नॅप’चे फायदे
nमेंदूची कार्यक्षमता वाढते
nस्मरणशक्ती वाढते
nअचूकता आणि समयसूचकतेत वाढ
nतणाव हलका होण्यास मदत 
nरक्तदाब नियंत्रणात राहतो
nप्रतिकारशक्ती आणि मूड चांगला राहतो

जपानमध्ये वाढता ट्रेंड
कार्यालयीन वेळेत अल्पविश्रांती घेण्याचा ट्रेंड चांगलाच रूजला आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये आसन व्यवस्थाही तशाच प्रकारे तयार केली आहे. त्यानुसार ठराविक वेळेनंतर १५-२० मिनिटे विश्रांती घेण्यासाठी अलार्मही दिला जातो. 

Web Title: 94 percent of employees say, they need some time to sleep in the office! Better health along with increased performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.