दोन सेकंदाला एक मूल वेळेआधीच येतेय जन्माला; ‘प्री-मॅच्युअर’ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:29 PM2023-05-12T12:29:11+5:302023-05-12T12:29:29+5:30
जगभरात प्रत्येक दोन सेकंदाला एक मूल हे वेळेआधीच (प्री-मॅच्युअर) जन्माला येत आहे.
जिनिव्हा : जगभरात प्रत्येक दोन सेकंदाला एक मूल हे वेळेआधीच (प्री-मॅच्युअर) जन्माला येत आहे. यातील एका बालकाचा दर ४० सेकंदाला मृत्यू होतो. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने जारी केलेल्या नव्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या जजचे प्रमोशन रोखले; सुप्रीम कोर्टाने फटकारले, परत पाठवले!
अहवालानुसार, २०२० मध्ये वेळेआधीच जन्मलेल्यांमध्ये (गर्भधारणेच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेले बाळ) जवळपास अर्धे हे भारत, पाकिस्तान, नायजेरिया, चीन आणि इथिओपिया या पाच देशांमधील आहेत. या पाच देशांमध्ये जगभरातील ४५ टक्के अकाली बाळांना जन्म दिला जातो. यामध्येही भारतात सर्वाधिक ३०.१६ लाख अकाली मुलांचा जन्म झाला. या मुलांचा मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.
१ कोटी ३४ लाख बाळे वेळेआधीच जन्माला
एकूण ४६ देशांमधील १४० हून अधिक जणांच्या मदतीने बॉर्न टू सून : डेकेड ऑफ ॲक्शन ऑन प्री-टर्म बर्थ हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
२०२० मध्ये जवळपास १ कोटी ३४ लाख मुले वेळीआधी जन्माला आली. यातील वेळेआधी जन्मलेल्या मुलांचा जन्मदर हा बांगलादेशमध्ये १६.२ टक्के असून, भारतामध्ये वेळीआधी जन्मलेल्या बाळांची संख्या सर्वाधिक होती.
वेळेआधी मुले का जन्माला येतात?
ही कारणे समानता आणि अधिकार, शिक्षण, संसाधने, पर्यावरणाशी संबंधित आहेत. महिलांना समान वागणूक, उत्तम शिक्षण, आरोग्यावर होणारा खर्च आणि वायू प्रदूषण ही कारणे यात प्रामुख्याने आहेत. अहवालानुसार, दरवर्षी ६० लाख मुले वायू प्रदूषणामुळे मुदतपूर्व जन्म घेतात.