बापरे! पोटदुखी असू शकतं हार्ट अटॅकचं कारण; 'अशी' ओळखा लक्षणं अन् करा बचाव, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:47 AM2022-02-02T11:47:38+5:302022-02-02T11:51:06+5:30

Heart Attack : हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, मान दुखणे, धाप लागणे इ. पण तुम्हाला माहीत आहे का की हार्ट अटॅक समस्येशी संबंधित आणखी काही लक्षणं आहेत.

abdominal pain can also be an early sign of heart attack know how to recognize it and preventive measures | बापरे! पोटदुखी असू शकतं हार्ट अटॅकचं कारण; 'अशी' ओळखा लक्षणं अन् करा बचाव, वेळीच व्हा सावध

बापरे! पोटदुखी असू शकतं हार्ट अटॅकचं कारण; 'अशी' ओळखा लक्षणं अन् करा बचाव, वेळीच व्हा सावध

googlenewsNext

आजच्या काळात अनेक जण धावपळीचं जीवन जगत आहे. कामाच्या तणावाखाली आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. असंतुलित आहाराचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळेच आजकाल हृदयविकाराच्या झटक्याशी (heart attack) संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक यांसारखे आजार कॉमन झाले आहेत. हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, मान दुखणे, धाप लागणे इ. पण तुम्हाला माहीत आहे का की हार्ट अटॅक समस्येशी संबंधित आणखी काही लक्षणं आहेत. हृदयाशी संबंधित काही गोष्टी समजून घेतल्यास पुढचा मोठा धोका आधीच टाळता येऊ शकतो.

जेव्हा जेव्हा आपल्या शरीराच्या धमन्यांमध्ये काही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा यामुळे आपले हृदय ऑक्सिजन युक्त रक्त पुरवू शकत नाही. या समस्येमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. विशेष म्हणजे पोटदुखीशी हृदयाचाही संबंध असतो, जसे की पोटदुखी आणि गॅस इत्यादी समस्या देखील होऊ शकतात. हार्ट अटॅकचा पोटदुखीशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया...

पोटाशी संबंधित लक्षणं 

साधारणपणे, आपल्याला श्वास घेण्यास त्रास होणं, हृदयाचे अनियमित ठोके, छातीत दुखणं ही लक्षणं हार्ट अटॅकची मुख्य लक्षणं मानली जातात. याशिवाय हार्ट अटॅकची काही महत्त्वाची लक्षणंही आहेत. ही अशी लक्षणे आहेत, ज्याकडे अनेकजण कधीच लक्ष देत नाही. यापैकी एक म्हणजे पोटदुखी. हार्ट अटॅकच्या समस्येच्या वेळी, हृदय शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नसेल, तर पोटात अनेक प्रकारचे रासायनिक बदल घडून येण्याची लक्षणं दिसू शकतात.

पोटदुखी

काही रुग्णांमध्ये, या समस्येदरम्यान तीव्र पोटदुखीची समस्या देखील असू शकते. पोटदुखीत तीव्र वेदना होत असतील तर त्याचा संबंध हार्ट अटॅकशी असू शकतो. जेव्हा तुमच्या हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा शरीरातील रक्त परिसंचरण थांबते आणि नंतर पोटात आम्लता वाढते, ज्यामुळे पोटदुखी होते.

अपचन आणि ढेकर येणे

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अपचन आणि ढेकरही रुग्णाला येतात. जर तुम्हाला सतत अपचन आणि ढेकर येत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. काही रिपोर्ट्सनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी अपचन आणि ढेकर येण्याची समस्या जास्त असू शकते. इतकेच नाही तर रुग्णांना मळमळण्याची समस्या देखील असू शकते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर ते गांभीर्याने घ्या.

उलट्या

आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे किंवा समस्या आल्याने तुमच्या आतड्याला रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो, त्यामुळे रुग्णाला उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होतो. असं म्हटले जाते की जेव्हा आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा पोटाचा त्रास होतो.

डॉक्टरांशी संपर्क साधा

जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या होत असेल तर नक्कीच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. या समस्यांना कोणीही हलक्यात घेऊ नये. हार्ट अटॅक येण्यापूर्वी, जर तुम्हाला तुमच्या पोटाशी संबंधित लक्षणांसह या समस्या येत असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. चक्कर येणे, थंड वातावरणातही भरपूर घाम येणे, थकवा आणि अशक्तपणा, उलट्या आणि मळमळांसह पोटदुखी - छातीत दुखणे आणि श्वास घेण्यात अडचण येणं याचा समावेश आहे. 

हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी टीप्स

- स्वतःला तणाव आणि चिंतांपासून दूर ठेवा.
- आरोग्यपूर्ण आहार आणि जीवनशैली निवडा.
- दारू आणि धूम्रपानाचे व्यसन टाळा.
- जंक फूडचे सेवन करू नका.
- फळे आणि भाज्यांचा आहार.
- रोज व्यायाम करा किंवा योगासने करा.
एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)
 

Web Title: abdominal pain can also be an early sign of heart attack know how to recognize it and preventive measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.