324 किलो वजन घटवून इमान चालली अबूधाबीला. तुम्हाला किती घटवायचंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 04:35 PM2017-05-03T16:35:57+5:302017-05-03T16:35:57+5:30

इमानसारखे लठ्ठ नसाल(च) तुम्ही, पण पोटाचा घेर तुम्हालाही काबूत आणायचाय ना? मग हे दहा उपाय फक्त तुमच्यासाठी.

Abhabadabi running down to 324 kilos. How much do you want to eat? | 324 किलो वजन घटवून इमान चालली अबूधाबीला. तुम्हाला किती घटवायचंय?

324 किलो वजन घटवून इमान चालली अबूधाबीला. तुम्हाला किती घटवायचंय?

googlenewsNext

 - मयूर पठाडे

 
जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून जगप्रसिद्ध झालेली इजिप्तची इमान अहमद उपचारांसाठी आणि आपलं वजन कमी करण्यासाठी भारतात आली. आल्यापासून सर्व माध्यमांचं लक्ष तिनं आपल्याकडे वेधून घेतलं. तिला हवं होतं ते बर्‍यापैकी साध्य करतानाच नवा वाद निर्माण करून पुन्हा प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून आता ती उद्या पुढील उपचारांसाठी भारतातून अबूधाबीकडे रवाना होत आहे. 
डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमनं मुबंईतील सैफी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचं वजन चांगलंच कमी झालं. पाचशे किलोवरुन चक्क 176 किलोपर्यंत घसरताना तिनं चक्क 324 किलो वजन कमी केलं.
अर्थातच हे वजन तिनं कमी केलं नाही, तर तिच्यावर ुउपचार करणार्‍या डॉक्टरांनी तिचं हे वजन कमी केलं आणि ती निदान उठू, बसू शकेल, हालचाल करू शकेल, इतपत ‘चैतन्य’ तिच्यात निर्माण केलं. पण आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करून 81 दिवसांच्या भारतातील मुक्कामानंतर ती आता दुसर्‍या देशात उपचारांसाठी रवाना होते आहे.
मुळातच काही नैसर्गिक व्याधी घेऊन जन्माला आलेल्या इमानला सुरुवातीपासूनच लठ्ठपणाचा त्रास होता. ती जन्माला आली तेव्हाच तब्बल पाच किलो वजनाची होती. त्यानंतर तिचं वजन झपाट्यानं वाढत गेलं. लहानपणीही तिला उभं राहण्याऐवजी हातांवर जोर देऊन रांगतच पुढे सरकरण्याची कसरत करावी लागली. याच कारणामुळे वयाच्या अकराव्या वर्षीच तिला शाळाही सोडावी लागली. कोणतीच गोष्ट ती स्वत:च्या हातानं करू शकत नव्हती. 
वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे तिचं आयुष्य सर्वस्वी आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून होतं. त्यांच्या मदतीशिवाय ती काहीच करू शकत नाही. आजही तिची तिच परिस्थिती आहे. अर्थात मुंबईतील उपचारानंतर त्यात बराच फरक पडला आहे.
 
 
1- हाय प्रोटिन ब्रेकफास्ट-
ब्रेकफास्टसाठी हाय प्रोटिन्स असलेला ब्रेकफास्ट घेतल्यास तुमची ‘खा खा’ही थोडी कमी होईल आणि कॅलरीज इनटेकही घटेल.
 
2- शुगर ड्रिक्स अािण फुट्र ज्यूस शक्यतो टाळा-
आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यास वजनावरही त्याचा झपाट्यानं परिणाम होतो आणि तुमचं वजन तुम्हाला घटताना दिसेल. इन्सुलिन लेव्हल कमी होईल, भूक कमी लागेल आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसू शकेल.
 
3- जेवणापूर्वी पाणी प्या-
जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी जर तुम्ही पाणी पिण्याची सवय स्वत:ला लावली, तर तीन महिन्यातच तुमचं वजन बर्‍यापैकी कमी झालेलं तुम्हाला दिसू शकेल. तब्बल 40 टक्क्यांनीही तुम्हाला ते घटलेलं दिसू शकेल.
 
4- योग्य आहार-
योग्य आहार म्हणजे काय? - तर वेट लॉस करतील अशाच आहारावर लक्ष द्या. ब्रोकोली, काकडी, कोबी, फुलकोबी, पालक. इत्यादी गोष्टींवर आहारात जास्त भर द्या. प्रत्येक जेवणात प्रोटिन्स, फॅटसचा समावेश करताना ज्यात कमी काबरेहायड्रेट्स (कर्बाेदकं) आहेत अशा अन्नघटकांचा समावेश करा. 
 
5- फायबर सप्लिमेण्टसचा वापर वाढवा-
आहारात फयबर सप्लिमेण्ट्स, म्हणजेच तंतूमय पदार्थांचा वापर वाढवल्यास वजन तर कमी होईल, पण सर्वात मुख्य फायदा म्हणजे पोटाचा घेर कमी होण्यास त्याची मदत होईल.
 
6- ‘पूर्ण’ अन्न खा-
आहारात शक्यतो पूर्ण अन्न खावे. उदाहरणार्थ फळं कापून खाण्याऐवजी अख्खे फळ खाणे उत्तम. अन्नघटक अनप्रोसेस्ड म्हणजे त्यांच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसावी.
 
7- सावकाश आणि चावून खा-
जेवताना अन्न सावकाश आणि चावून खाल्ल्यानं पोट लवकर भरल्याची जाणीव होते आणि अधिकचं अन्न पोटात ढकलण्यापासून आपली सुटका होते.
 
8- जेवताना छोटी प्लेट घ्या-
संशोधनानी हे सिद्ध केलं आहे, की जेवताना जर आपण लहान प्लेटमध्ये अन्न वाढून घेतलं तर आपोआपच आपल्या खाण्यावरही नियंत्रण राहतं.
 
9- पुरेशी झोप घ्या-
अपुरी झोप हे वजन वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे शांत आणि पुरेशा झोपेकडे व्यवस्थित लक्ष द्या.
 
10- कॉफी आणि चहा-
तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यामुळेही वजन आटोक्यात राहू शकतं. पण त्याचं तारतम्य बाळगायला हवं.

 

Web Title: Abhabadabi running down to 324 kilos. How much do you want to eat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.