तुम्हाला अजिबातच घाम येत नाही का? जाणून घ्या याचे गंभीर परिमाण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 09:42 AM2019-12-03T09:42:17+5:302019-12-03T09:57:46+5:30
हिवाळा असो वा उन्हाळा शरीराला घाम येणं फार गरजेचं असतं. याने केवळ शरीरातील विषारी तत्वच बाहेर येत नाही तर शरीराचं तापमानही नियंत्रित राहतं.
(Image Credit : dermstore.com)
हिवाळा असो वा उन्हाळा शरीराला घाम येणं फार गरजेचं असतं. याने केवळ शरीरातील विषारी तत्वच बाहेर येत नाही तर शरीराचं तापमानही नियंत्रित राहतं. पण अनेकांना घामच येत नाही किंवा फार कमी घाम येतो. अशात ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. अजिबातच घाम न येण्याची स्थित समजून घ्यायची असेल तर दोन पद्धतीने समजून घेता येईल. चला जाणून घेऊ काय असते ही स्थिती....
एन्हीड्रोसिस आणि हायपोहीड्रोसिस?
(Image Credit : 2bstronger.com)
एन्हीड्रोसिस (Anhidrosis) एक अशी स्थिती असते ज्यात व्यक्तीला अजिबातच घाम येत नाही. तर हायपोहीड्रोसिस स्थितीत व्यक्तीला सामान्यापेक्षा कमी घाम येतो. ज्या लोकांना खूप मेहनत केल्यावर किंवा एक्सरसाइज केल्यावर घाम येत नसेल त्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो. जास्त तापमान असल्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मेंदूसोबतच शरीराच्या इतर अवयवही डॅमेज होऊ शकतात.
एन्हीड्रोसिस
(Image Credit : medicalnewstoday.com)
International Hyperhidrosis Society नुसार, घाम न येणे जीवघेणं ठरू शकतं. एन्हीड्रोसिसने पीडित लोक जर जास्त तापमानात हेवी एक्सरसाइज करत असतील किंवा जास्त मेहनत करत असतील तर त्यांच्यासाठी हे गंभीर ठरू शकतं. घाम येत नसल्याने त्यांना हीट स्ट्रोकसोबत बेशुद्धी आणि चक्कर येऊ लागतात. काही प्रकारणांमध्ये हीट संबंधी समस्यांवर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्ती कोमात जाऊ शकतो किंवा जीवाला धोका होऊ शकतो.
एन्हीड्रोसिसची कारणे
(Image Credit : feminiza.com)
- काही औषधे अशी असतात ज्याने स्वेट ग्लॅंड्सच्या क्रियेत अडचण निर्माण होते आणि ग्लॅड्स ब्लॉक होतात. खासकरून मानसिक समस्या दूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे ही समस्या होऊ शकते.
- काही लोकांना जन्मजात स्वेट ग्लॅंड्स नसतेच. पण अशा केसेस कमीच असतात.
- ब्लड प्रेशर, घाम आणि अंतर्गत क्रियांना नियंत्रित करणाऱ्या नसांना काही इजा झाली असेल तर त्याने एन्हीड्रोसिस म्हणजे घाम न येण्याची स्थिती तयार होऊ शकते.
- ही समस्या एन्हीड्रोसिसचं मुख्य कारण मानलं जातं. ही समस्या रोमछिद्रे ब्लॉक करतात. ज्यामुळे घाम येणं बंद होतं.
- शरीरात पाण्याची कमतरता आणि त्वचेवर एखाद्या प्रकारची जखम झाल्याने घाम न येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.