जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराला होतं नुकसान?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:43 PM2019-03-21T17:43:32+5:302019-03-21T17:44:32+5:30

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं.

Access of water is harmful for health | जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराला होतं नुकसान?; जाणून घ्या

जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराला होतं नुकसान?; जाणून घ्या

(Image Credit : cookinglight.com)

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याव्यतिरिक्त पाणी आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठीही पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. डाएटसोबतच पाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो. पाणी ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्यासोबतच एनर्जी बूस्ट करण्यासाठीही मदत करतं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वेट लॉस प्लॅन बिगडूही शकतो. 

फॅट्स 

आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स जमा होतात. कधी-कधी त्यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही एकाच वेळी जास्त पाणी प्यायलात तर किडनी एकाच वेळी ते सर्व पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर काही वेळाने पाणी प्या. जर तुमच्या डाएटमध्ये सोडियम जास्त आणि पोटॅशिअम कमी असेल तर शरीर जास्त पाणी घेण्यासाठी सक्षम असतं. 

प्रदुषक तत्व 

जर तुम्ही शुद्ध पाणी पित नसाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. काही ऑर्गॅनिक तत्व तुमचं वजन वाढवू शकतात. 

एवढं पाणी प्या

एका व्यक्तीला दिवसभरामध्ये केवढं पाणी पिणं गरजेचं असतं. त्याचं कोणतंही प्रमाण ठरलेलं नाही. हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसं तुमचं वजन, वातावरण आणि तुमचं काम यांवर अवलंबून असतं. महिलांना दिवसभरामध्ये कमीतकमी 3 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं आणि पुरूषांना 305 लीटर पाणी पिणं आवश्यक असतं. तुमच्यासाठी किती पाणी पिणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

Web Title: Access of water is harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.