डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा हजारो वर्ष जुना आयुर्वेदिक उपाय, डोळ्यांच्या सगळ्या समस्या होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:21 AM2024-09-05T11:21:23+5:302024-09-05T11:21:51+5:30

अचानक डोळ्यांनी धुसर दिसणे, दूरचं किंवा जवळचं न दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी हजारो वर्ष जुना एक उपाय तुम्ही रात्री करू शकता. 

According Ayurveda using triphala increase vision and make your eyes sharp in 3 months | डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा हजारो वर्ष जुना आयुर्वेदिक उपाय, डोळ्यांच्या सगळ्या समस्या होतील दूर!

डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा हजारो वर्ष जुना आयुर्वेदिक उपाय, डोळ्यांच्या सगळ्या समस्या होतील दूर!

आजकाल अनेक लोकांना कमी वयातच चष्मा लागतो. आधी हा समस्या वाढत्या वयाची समस्या होती. पण आता तर लहान मुलांना सुद्धा चष्मा लागतो. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र, आयुर्वेदात यावर एक रामबाण उपाय आहे. ज्याचा वापर करून तुम्ही डोळ्यांची समस्या दूर करू शकता. अचानक डोळ्यांनी धुसर दिसणे, दूरचं किंवा जवळचं न दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी हजारो वर्ष जुना एक उपाय तुम्ही रात्री करू शकता. 

आयुर्वेदानुसार त्रिफळा हा डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्याचा सगळ्यात चांगला उपाय आहे. याने डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. साधारण तीन महिन्यात या उपायाने तुमच्या डोळ्यांचा चष्मा दूर होऊ शकतो. 

दृष्टी चांगली करण्यासाठी काय खावं?

बाजारातून त्रिफळा घेऊन या. घरीच याचं पावडर तयार करा. तीन फळं बारीक करा आणि पावडर थोडं जाडसर ठेवा. याचं एक चमचा पावडर मध किंवा तूपामध्ये मिक्स करून पेस्ट बनवा. रात्री झोपताना ही पेस्ट चाटून खावी.

त्रिफळा चूर्णाचा फायदा

त्रिफळामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा ही तीन फळं असतात. याचा वापर चूर्ण बनवण्यासाठी केला जातो. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हा बेस्ट उपाय मानला जातो. त्यासोबतच इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर आयुर्वेदात केला जातो. बद्धकोष्ठतेसोबतच याने लठ्ठपणा, कमजोर दृष्टी, अपचन, केसगळती, यूटीआय, भूक न लागणे अशा समस्या सुद्धा दूर होण्यास मदत मिळते.

डोळ्यांसाठी त्रिफळा फायदेशीर

त्रिफळाच्या सेवनाने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. याच्या मदतीने डोळ्यांची इनफ्लामेशन, धुसर नजर, इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. याने डोळे कोरडे होण्याची समस्या सुद्धा दूर होते. डोळ्यांची आतून सफाई होते.

त्रिफळाने डोळे धुवा

आयुर्वेदात त्रिफळाने डोळे धुण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. यात त्रिफळाचं पावडर पाण्यात उकडलं जातं. नंतर हे पाणी थंड झाल्यावर चांगलं गाळून घ्या. त्यानंतर या पाण्याने डोळे धुवा. अशाप्रकारे डोळ्यांची आतून सफाई होईल.

Web Title: According Ayurveda using triphala increase vision and make your eyes sharp in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.